कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:40 PM2020-09-22T23:40:52+5:302020-09-22T23:41:06+5:30

नवी मुंबईत पर्यावरणाची हानी; निष्काळजीपणा करणाºया ठेकेदाराला प्रशासनाचेच अभय

Neglect of maintenance of waste transport vehicles | कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील कचरा वाहतूक करणाºया वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रस्त्यावर पडू लागला आहे. पर्यावरणाची हानी होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असूनही मनपा प्रशासन काहीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने २०१५ मध्ये कचरा वाहतुकीचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. ठेकेदाराला बांधा, वापरा व हस्तांतर करा, या तत्त्वावर वाहने उपलब्ध करण्यास सांगितले आहे. सद्यस्थितीमध्ये जवळपास ६५ मोठी व ८५ लहान वाहनांमधून कचरा वाहतूक केली जात आहे. ठेकेदाराने सात वर्षे या वाहनांचा वापर करून ती महानगरपालिकेला हस्तांतर करणे अपेक्षित आहे, परंतु पाच वर्षांतच अनेक वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रोडवर पडत आहे. ओला कचºयातून दुर्गंधीयुक्त पाणी रोडवर पडत आहे. काही वाहनांचे आरसे, काचा तुटल्या आहेत. ठेकेदार दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नादुरुस्त वाहनांमधून कचरा वाहतूक केल्यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या विशेषत: कचरा वाहतुकीच्या वाहनांवर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. समाज समता कर्मचारी संघटनेनेही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वाहनांची नियमित देखभाल, दुरुस्ती करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल, तर महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षीत आहे, परंतु प्रशासनान निष्काळजीपणा करणाºया ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील दोन वर्षांत वाहने खिळखिळी होतील व भंगार वाहनांमधून कचरा वाहतूक करणे अशक्य होईल. पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन वाहने विकत घ्यावी लागणार आहेत.
कामगार संघटनेने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी वाहने दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन दिले आहे.
नागरिक नाराज
च्नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानात देशात तिसरा क्रमांक आला आहे. घनकचरा व्यवस्थापनात यापूर्वी देशात पहिला क्रमांक आला आहे.
च्नवी मुंबईसारख्या स्वच्छ शहरात घनकचरा वाहतूक करणाºया वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याबद्दल नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
च्महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Neglect of maintenance of waste transport vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.