नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या वाड्यांत राहणाºया ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या आदिवासी वस्त्या आहेत. कर्जत- मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग ताडवडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून झालेले हे रस्ते बांधण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया या रस्त्यांची अनेक वर्षात देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडली आहे. रस्त्यावर वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. याठिकाणी परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय उपलब्ध नाही. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते, त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेकआदिवासी उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किमी अंतर पार करावयास लागते. आदिवासीवाडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या दहा बारा वर्षपासून आमच्या वाडीचा रास्ता खराब झालाय पण कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नाही ,रास्ता दुरीस्ती साठी मी स्वता लोकप्रतिनिधी कडे तक्र ार केली आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे.- मालू पारधी, ग्रामस्थआमच्या वाडीचा रस्त्या वर खड्डे पडल्याने आम्हाला रहदारी करणे मुश्किल झाले आहे ,रास्ता वळणाचा आणी चढ उताराचा असल्याने वाहन चालविणेही अवघड होतं आहे तातडीने प्रशासनाने लक्ष देऊन रास्ता दुरु स्तकरण्याची गरज आहे- पालू वारे, ग्रामस्थ जांभूळ वाडी
ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष; डोक्यावर ओझे घेऊन पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 3:25 AM