शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
5
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
6
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
7
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
8
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
9
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
10
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
11
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
12
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
13
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
14
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
15
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
16
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
17
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
18
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
19
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
20
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:40 AM

बिल्डरांची मनमानी : प्रशासनाचे दुर्लक्ष; पावसाला सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

कांता हाबळे 

नेरळ : नेरळ धामोते या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. हा परिसर प्राधिकरणात असल्यामुळे अनेक नामांकित गृह प्रकल्प येथे आकार घेत आहेत. मात्र, गृहप्रकल्प उभे करत असताना बिल्डर आपली मनमानी करत आहेत असे चित्र आहे. त्यामुळे येथील पूर्वापारपासूनचे नाले यांचे मार्ग पूर्णत: बंद होत आहेत. नेरळ विकास प्राधिकरणातील कोणी अधिकारी जागेवर येत नाही की ग्रामपंचायत त्यांना थांबवत नाही. त्यामुळे नेरळ-कळंब हा राज्यमार्ग दरवर्षी सातत्याने पाण्याखाली जात आहे. यंदा तर एका इमारत व्यावसायिकाने गृहप्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात भराव केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नेरळ-कळंब या रस्त्याची काय अवस्था होणार या विचाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कर्जत तालुक्यातील मोठे शहर म्हणून नेरळ आकार घेत आहे. तेव्हा शासनाने विकासाच्या दृष्टिकोनातून साधारण २००२ साली येथे नेरळ विकास प्राधिकरणाची स्थापना केली. तेव्हा इमारत व्यावसायिकाला बांधकाम करताना प्राधिकरणाची मंजुरी घेऊन काम करावे लागते. त्यासाठी विकास करदेखील प्राधिकरणाला द्यावा लागतो. या प्राधिकरणात नेरळसह, ममदापूर, बोपेले, धामोते या गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेरळ व्यतिरिक्त इतर भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सध्या सुरू आहेत. त्यापैकी धामोते गावाच्या हद्दीत नेरळ-कळंब या राज्यमार्गालगत सध्या एका गृहसंकुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने आणि पावसाळ्याचे पाणी याच मार्गाने नदीत जात असल्याने विकासकाने मातीचा मोठा भराव करून काम सुरू केले आहे. मुख्य रस्त्यापासून जमीन साधारण तीन फूट खाली आहे. तिथपासून मातीचा भराव करून बांधकाम वर उचलण्यात आलेले आहे. यामुळे पाण्याचा मुख्य मार्ग बंद होणार आहे. गेली काही वर्षे नेरळ-कळंब हा रस्ता सातत्याने पाण्याखाली जात आहे. येथे होणारी बांधकामे ही नियोजनशून्य पद्धतीने होत आहेत. परिणामी मुख्य नाल्याचा मार्ग वळविणे, तो खंडित करणे, अशा गोष्टी सर्रास घडत आहेत. मुळात जिल्हाधिकारी बांधकामासाठी परवानगी देतानाच त्यात मुख्य पाण्याच्या मार्गांना बाधित न करता बांधकाम करावे, अशा अटीवर बांधकाम परवानगी देत असतात. मात्र बिल्डर लॉबी आपली मनमानी करून बिल्डिंग बांधून निघून जातात. त्यानंतर तेथे राहणाऱ्या सदनिकाधारकांना भविष्यात अनेक संकटे, समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असते.२०१७ पासून नेरळ-कळंब रस्ता पाण्याखाली येत आहेत. तत्कालीन प्रांताधिकारी दत्ता भडकवाल यांनी धामोते येथे प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम व्यावसायिकांना पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजून बिल्डर लॉबीची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.येथील काम हे नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. कुणीही बिल्डर येतो आणि कुठेही बांधकाम करतो. यात स्थानिक प्रशासन असलेल्या ग्रामपंचायतीला काहीही घेणेदेणे नाही. जो तो सदस्य फक्त आपल्याला काय लाभ होईल याचाच विचार करतो. परिणामी याचे दुष्परिणाम गावाला आणि ग्रामस्थांना भोगायला लागतात.- दत्तात्रेय विरले, ग्रामस्थ, धामोतेसंबंधित बांधकाम व्यावसायिकाला आम्ही प्राधिकरणाची किंवा आणखी कोणती इमारत बांधकामाच्या परवानगीची कागदपत्रे ग्रामपंचायतीत सादर करायला सांगितले होते. मात्र त्यांनी ती अद्याप सादर केलेली नाहीत तसेच ग्रामपंचायतीचा बांधकाम ना हरकत दाखलादेखील घेतलेला नाही.- रामदास हजारे, उपसरपंच, कोल्हारे ग्रामपंचायत