नेरळ बोरलेत जुगार अड्ड्यांवर छापा, सात जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 04:39 AM2018-09-01T04:39:42+5:302018-09-01T04:40:24+5:30
सुमारे ८ लाखांचा माल हस्तगत
नेरळ : नेरळ परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून जुगाराच्या अड्ड्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. गुरु वारी नेरळ पोलिसांनी बोरले गावाजवळ असलेल्या फार्महाउस येथील सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर छापा टाकला. यावेळी सात जणांना पोलिसांनी अटक केली. रोख रक्कम व आरोपींची वाहने असा सुमारे ८ लाखांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला.
बोरले येथील फार्महाउसवर ७ जण जुगार खेळत होते. त्यांच्याकडे असलेला माल ताब्यात घेण्यात आला आहे. अमोल दशरथ जाधव, भूषण विठ्ठल जाधव, नितीन रघुनाथ घरत, दीपक तानाजी भोईर, प्रभाकर परशुराम जाधव, भगवान नामदेव गायकवाड, अरु ण किसन जाधव या सात जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून जुगारात मांडलेले ४ हजार रु पये तसेच अमोल जाधव यांच्याजवळील १२८२०, भूषण जाधव यांच्याजवळील ७८४०, नितीन घरत यांच्याजवळील ७०७०, दीपक भोईर यांच्याजवळील ८६१०, अरु ण जाधव यांच्याकडे ८७०० रु पये आढळले. तसेच सुमारे ६ लाख रु पये किमतीची पासिंग न झालेली कार (एम एच ४६ टी, सी २७ ए), चार दुचाकी असा एकूण ७ लाख ७९ हजार ४० रु पयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.