नेरळमध्ये तीन दुचाकी चोरांना अटक
By Admin | Published: February 1, 2016 01:40 AM2016-02-01T01:40:35+5:302016-02-01T01:40:35+5:30
नेरळ पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांनी परिसरात चार ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली नेरळ पोलिसांकडे दिली आहे
कर्जत : नेरळ पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांनी परिसरात चार ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली नेरळ पोलिसांकडे दिली आहे. हे तीनही आरोपी कर्जत तालुक्यातील खांडस येथील राहणारे असून त्यांच्याकडून सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. परंतु अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
२७ जानेवारी रोजी पोलीस रात्री गस्त घालत असताना तीन संशयित आरोपींना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात प्रमोद जगताप, एकनाथ ऐनकर, नितीन जाधव सर्व राहणार खांडस त्यांच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी आपण चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून आरोपींनी कर्जत पोलीस ठाणे, बदलापूर पोलीस ठाणे व नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, राम पवार, सहा. फौजदार दिलीप कचरे, पोलीस हवालदार सुरेश पार्टे, जगन्नाथ गवाळे, पोलीस नाईक प्रशांत देशमुख, सचिन नरु टे, पोलीस शिपाई म्हात्रे यांनी केली.
(वार्ताहर)