शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नेरळ-शेलू रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:35 PM

बदलापूर-कर्जत वाहतूक पूर्ववत; पावसामुळे वाहून गेले मेन लाइनवरील खडी, दगड

नेरळ : रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली मध्य रेल्वेची बदलापूर-कर्जत दरम्यानची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर न धावलेली रेल्वे वाहतूक सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून आतापर्यंत तीन मालगाड्या भरून दगड आणि खडी आणण्यात आली आहे.शनिवारी रात्रीपासून असलेल्या पावसाने शनिवारी पहाटेनंतर मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जत दरम्यान वाहतूक बंद पडली होती. रविवारी सकाळी मेन लाईनपासून काही अंतरावर वाहणाऱ्या उल्हासनदीला आलेल्या पुराचे पाणी नेरळ आणि शेलू या रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या शेलू एसएसपी बी केबिनच्या पुढे नेरळकडील ३०० मीटरचा डाऊन मार्गावरील मातीचा भराव वाहून जातानाच त्या ठिकाणी असलेले दगड आणि खडी ही मोठ्या प्रमाणात वाहून गेली होती. त्याचवेळी पहाटेपासून य भागातील सिग्नल व्यवस्था बंद पडल्याने रविवारी दिवसभर एकही गाडी या मार्गावरून पुढे गेली नाही. मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गाचे झालेले नुकसान लक्षात घेता मध्य रेल्वेच्या बदलापूर-कर्जत मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील ही स्थिती लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यास रेल्वेच्या पीडब्लूआय विभागाने तयारी सुरू केली. कर्जत येथून अप मार्गाने सायंकाळी ४१ डब्यांची मालवाहू गाडी रेल्वे ट्रकच्या खालील माती वाहून गेलेल्या ठिकाणी पोहचली होती. त्या मालगाडीमधील दगड हे खांब क्रमांक ८३१७ पासून ८३१२ या दरम्यान टाकण्यासाठी पीडब्लूआय विभागातील २०० कर्मचारी लावले होते. त्या रेल्वे कामगार तसेच कंत्राटी कामगार यांनी दगड टाकून पडलेले खड्डे भरण्याचा प्रयत्न केला.५ आॅगस्ट रोजी सकाळी मध्य रेल्वेच्या तांत्रिक विभागाने २४तास बंद असलेली सिग्नल यंत्रणा सुरू केल्याने प्रवाशांना हायसे वाटले होते. परंतु मध्य रेल्वेने बदलापूर-कर्जत दरम्यान लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केल्याने प्रवासी कोणीही बाहेर निघाले नव्हते. सोमवारी दुपारी कर्जत येथून एका मालवाहू गाडीमध्ये खडी आणण्यात आली तर वांगणी येथून एका मालवाहू गाडीमधून दगड आणण्यात आले आहेत. त्या माध्यमातून मेन लाईनवरील शेलू-नेरळ दरम्यानचा मार्ग पुन्हा सुस्थितीत करण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. त्या ठिकाणी ३०० मीटरचा मार्ग पुन्हा तयार करण्यासाठी मध्य रेल्वेचे १०० कामगार आणि कंत्राटी असे २०० कामगार काम करीत आहेत. पीडब्लूआय विभागाचे वरिष्ठ अभियंता वाय पी सिंग हे जातीने उभे राहून टॅÑक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन्ही ंगाड्यांमधील दगड टाकून त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू होते.नेरळ शेलू दरम्यान टॅÑकमधील वाहून गेलेली माती आणि त्यावर खडी टाकण्याचे काम करून झाल्यानंतर मेन लाइनवरील ट्रॅक उपनगरीय सेवा आणि एक्स्प्रेस गाड्या जाण्यासाठी सुस्थितीत आहे किंवा नाही? हे तपासले जाणार आहे. त्यासाठी एक मालवाहू गाडी वांगणी येथून सोडली जाईल. त्यानंतर उपनगरीय सेवा सुरू करण्याचा निर्णय होईल.- वाय. पी. सिंगस,अभियंता, मध्य रेल्वे.