कर्जत : नेरळ शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीमधील घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करण्यात आली. घरातील महिला बाहेर गेल्यानंतर अध्या तासाच्या कालावधीत लोखंडी कपाट फोडून तब्बल ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना घडली. भरदिवसा ही चोरीची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नेरळ पोलीस स्टेशन हद्दीमधील शिवाजी महाराज मैदानासमोरील मुख्य रस्त्यावर रघुवंश अपार्टमेंट आहे. तेथे तळमजल्यावर असलेल्या चार फ्लॅटपैकी केवळ एका फ्लॅटमध्ये रहिवासी राहत आहेत, तेथील अन्य तीन फ्लॅट बंद असतात. गुरु वारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फ्लॅटचे मालक गुंजेश खेमराज शाह यांच्या पत्नी नेहा या नेरळच्या बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या पाच वाजण्याच्या सुमारास घरी परत आल्या, तेव्हा नेहा गुंजेश शाह यांना धक्का बसला. कारण त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसून आले.त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता बेडरूममधील लोखंडी कपाट फोडले होते. बेडरूममधील लाकडी कपाटात नेहमीच्या जागेवर ठेवलेली चावी घेवून लोखंडी कपाट उघडून त्यातील वस्तूंची तपासणी करण्यात आली होती.कपाटाच्या तिजोरीत ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते.घर बंद असताना केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत त्या चोरट्यांनी गुंजेश शाह यांच्या घरातील तब्बल ३५ तोळे सोने आणि २५ हजार रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. चोरी झाल्यानंतर नेहा गुंजेश शाह यांनी तत्काळ रघुवंश अपार्टमेंटमधील सर्वांना चोरीची माहिती दिली. त्यानंतर चोरीची तक्रार नेरळ पोलिसांना देण्यात आली. (वार्ताहर)नऊ लाख रुपयांचा ऐवज गेला चोरीलाहवालदार गिरी आणि दुसाने यांनी घरफोडी झालेल्या घरी जावून पंचनामा केला. त्यानंतर नेरळ पोलीस स्टेशनमधून कर्जत तसेच रेल्वे पोलिसांना घरफोडीबाबत सतर्ककरण्यात आले. दिवसाढवळ्या साधारण ९ लाख रु पयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याने नेरळ पोलीस चक्र ावले आहेत. दिवसा अशा प्रकारची चोरी झाल्याने गृहिणींमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
नेरळमध्ये भरदिवसा घरफोडी
By admin | Published: April 02, 2016 2:54 AM