आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यातील सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रे ते, दूधविक्रेते, पेट्रोल पंपचालक यांनी त्यांच्या कामगारांसह अँटिजेन, आरटीपीसीआर टेस्ट स्वखर्चाने तत्काळ करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. सोशल मीडियावरील कलेक्टर रायगड या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांच्या या भुर्दंड ठरणाºया सल्ल्याला नेटकºयांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे.गणेशोत्सव सुरू होत असल्याने, कोरोना संसर्गाचा धोका वाढणार असल्याची भीती आरोग्य यंत्रणेने व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही अशीच चिंता लागलेली असावी, यासाठी त्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते, दूधविक्रे ते, पेट्रोल पंपचालक यांनी आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वखर्चाने त्यांची स्वत:ची, तसेच त्यांच्या दुकानामध्ये काम करणाºया कर्मचाºयांची अँटिजेन, आरटीपीसीआर टेस्ट तत्काळ करून घ्यावी, असा सल्ला दिला आहे. टेस्टबद्दलची माहिती नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, तहसीलदार यांना द्यावी, असे आवाहन केले आहे.>रॅपिड अँटिबॉडी, रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी दर>अँटिबॉडी टेस्ट (इएलआयएसए) : रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास ४५० रुपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ५०० रु., रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास ६०० रुपये.अँटिबॉडी टेस्ट (सीएलआयएसए) : रुग्ण स्वत: तपासणीसाठी आल्यास ५०० रुपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ६०० रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास ७०० रुपये.रॅपिड अँटिबॉडी टेस्ट : रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास ६००रुपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास ७०० रु. रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास८०० रुपये.>मोफत ठेवा चाचणी. राजकारणी सरकारी अधिकारी कसे कंट्रोलमध्ये ठेवतात, हे तुमच्या आजच्या निर्णयावरून सिद्ध झाले.- सिद्धेश पाटील>एकतर गणपती त चार पैसे मिळतील, म्हणून बांधावर भाजीपाला लावायचा आणि आता विकायला टेस्ट करून जायचे. टोपलीभर भाजीचे जेवढेपैसे मिळणार नाहीत, त्याहीपेक्षा जास्त कदाचित टेस्टला लागतील.- संजय कांबळे
भुर्दंड ठरणाऱ्या सल्ल्याला नेटकऱ्यांनी घेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:45 PM