कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक; ३४ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:40 PM2020-09-05T23:40:24+5:302020-09-05T23:40:36+5:30
तालुक्यात ९९० रुग्ण
कर्जत : कर्जत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शुक्रवारी रुग्णसंख्येचा उच्चांक झाला होता. शनिवारी ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने नवा उच्चांक झाला आहे.
आजपर्यंत तालुक्यात ९९० रुग्ण आढळले असून, तालुका रुग्ण संख्येच्या बाबतीत हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ७६१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. शनिवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४४ वर गेली आहे. आज शहरात आठ रुग्ण सापडले आहेत, परंतु तालुक्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या रुग्णसंख्येने भीतिदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कर्जत शहरातील ३७ वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुद्रे खुर्दमधील ६० वर्षीय महिलेचा, तसेच मुद्रे बुद्रुकमधील नेमिनाथ सोसायटीमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षांच्या महिलेचा व १२ वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विठ्ठलनगरमधील ५४ वर्षीय व्यक्तीचा, तसेच सिद्धिविनायक प्लाझा इमारतीत राहणाºया ७० वर्षीय वयस्कर महिलेचा तिच्या ४३ वर्षीय मुलाचा व ३८ वर्षांच्या सुनेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोसरीमधील ३४ वर्षांच्या युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे. बीडमधील ४६ वर्षीय महिला व ४५ वर्षीय व्यक्तीसुद्धा कोरोनाबाधित झाली आहे.
हालीवलीमधील २८ वर्षांच्या महिलेचा व तिच्या ९ वर्षांच्या मुलाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चांदईमधील ४८ वर्षांची व्यक्ती व ४३ वर्षांच्या महिलेला, तसेच पिंपळपाडा येथील ४८ वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. गुढवणमधील २४ वर्षीय तरुण व खांडसमधील २३ वर्षीय तरुणी यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. गणेगाव येथील एका २७ वर्षांच्या व डिकसळमधील १९ वर्षांच्या युवकालाही कोरोनाची लागण झाली आहे.
कळंब येथील ४६ वर्षांच्या व्यक्तीचा ३९ वर्षांच्या व्यक्तीचा, तसेच ४४ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वावे येथील दोन ४० वर्षांच्या व्यक्ती बाधित आहेत. लाडीवली येथील ४१ व कडाव येथील एका ४७ वर्षांच्या महिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माथेरानमधील ४६ वर्षांच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तमनाथ येथील २६ वर्षांचा युवक व कुंडलज येथील ३३ वर्षांची महिला बाधित झाली आहे. मानिवली येथील ३८ वर्षांच्या महिलेचा, तसेच नेवळी येथील ४८ वर्षांच्या व्यक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अनाची वाडी येथील ३८ वर्षीय आणि नेरळ नजीकच्या मोहाची वाडी येथील ३८ वर्षांच्या व्यक्तीलाही बाधा झाली आहे. उकरूळमधील एका ५५ वर्षांची व्यक्तीही कोरोनाबाधित झाली आहे.