नेवाळी ग्रामस्थ चार दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:00 AM2019-08-01T02:00:57+5:302019-08-01T02:01:02+5:30
ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात संताप : सततच्या पावसामुळे ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने अडचण
नेरळ : परिसरातील नेवाळी गावातील ट्रान्स्फॉर्मरमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बिघाड झाल्याने नेवाळी गाव गेल्या चार दिवसांपासून अंधारात आहे. महावितरणकडून अद्याप नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला नसल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात अंधाराचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला आहे.
नेरळ शहरापासून तीन कि.मी. अंतरावर नेवाळी गाव आहे. सतत आठवडाभर कोसळणाºया पावसामुळे नेवाळी गावाला वीजपुरवठा करणाºया ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत असून, अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने त्रस्त झाले आहेत.
अनेक वेळा महावितरणच्या निदर्शनास आणूनही नवीन ट्रान्स्फॉर्मर अद्याप बसविण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला असून लवकरात लवकर ट्रान्स्फॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नेवाळी गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्या जागेवर नवीन ट्रान्स्फॉर्मर मागविला आहे. आज तो नवीन ट्रान्स्फॉर्मर लावून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
- आनंद घुळे, उपअभियंता, महावितरण-कर्जत