माथेरानमध्ये १०८ रु ग्णवाहिका बंदमुळे नवजात बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:57 AM2017-10-30T00:57:38+5:302017-10-30T00:57:41+5:30
महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका तसेच दोन रु ग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र, या रु ग्णवाहिका सेवा सर्वसामान्यांना मिळतीलच याची शाश्वती नाही.
माथेरान : महाराष्ट्र शासनाची १०८ रुग्णवाहिका तसेच दोन रु ग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र, या रु ग्णवाहिका सेवा सर्वसामान्यांना मिळतीलच याची शाश्वती नाही. कारण येथील १०८ रुग्णवाहिका सेवा ही गेले कित्येक दिवस बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे येथील एका नवजात बालकास आपला प्राण गमवावा लागला आहे.
माथेरान नगरपरिषद बी. जे. हॉस्पिटल येथे २५ आॅक्टोबर रोजी सकाळी प्रसूतीसाठी दोन महिला रु ग्ण आल्या. याठिकाणी दोन्ही महिला रु ग्णांची प्रकृती गंभीर असल्याने माथेरान दवाखान्यात पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील डॉक्टरांनी हे रु ग्ण तत्काळ येथून दुसºया दवाखान्यात हलवण्याचा सल्ला दिला होता. परंतु १०८ रु ग्णवाहिका बंद अवस्थेत दवाखान्याच्या आवारातच उभी असल्याने यावेळी डॉ. उदय तांबे यांनी प्रणिता प्रमोद पारटे यांची प्रसूती येथेच करण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात रूपाली कडू ही दुसरी प्रसूतीसाठी महिला रु ग्ण आल्याने डॉक्टरांसह कर्मचाºयांची तारांबळ उडाली. रूपाली कडू यांना तत्काळ येथून हलवण्यासाठी १०८ रु ग्णवाहिकेसाठी कॉल दिला असता कशेळे येथील रु ग्णवाहिका माथेरान येथे पाचारण करण्यात आली. परंतु रस्त्यांची वाताहत व घाट रस्ता असल्याने पावणे दोन तास ही रु ग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने या सर्व प्रकारात भरपूर वेळ गेल्यामुळे रूपाली कडू यांची प्रकृती अजून खालावली. त्यांना तातडीने कशेळे येथून आलेल्या १०८ रु ग्णवाहिकेतून पुढे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु रस्त्यांची दुरवस्था, बंद अवस्थेत असलेल्या रु ग्णवाहिकेमुळे झालेला विलंब तसेच बी. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टर कार्यरत असताना एकाच डॉक्टरची उपलब्धता असल्याने व अपुरा कर्मचारी वर्ग या सर्व प्रकारातून घडलेल्या निष्काळजीपणामुळे रूपाली कडू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या नवजात अर्भकाने हे जग पाहण्याअगोदरच अखेरचा श्वास घेतला.