‘वाचन चळवळ टिकवण्यात वृत्तपत्रांचे मोलाचे योगदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:01 PM2018-10-14T23:01:01+5:302018-10-14T23:01:40+5:30

अलिबाग : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा १५ आॅक्टोबर हा जन्मदिन. प्रारंभीच्या काळात त्यांनी वृत्तपत्र वितरणाचा ...

'Newspaper contribution to save reading movement' | ‘वाचन चळवळ टिकवण्यात वृत्तपत्रांचे मोलाचे योगदान’

‘वाचन चळवळ टिकवण्यात वृत्तपत्रांचे मोलाचे योगदान’

Next

अलिबाग : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा १५ आॅक्टोबर हा जन्मदिन. प्रारंभीच्या काळात त्यांनी वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय केला, त्यातूनच यशोशिखर गाठलेल्या अब्दुल कलाम यांचा जन्मदिन या वर्षीपासून देशभरात ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून देशात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची जडणघडण, त्यांची व्यावसायिक वाटचाल, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अलिबागकर ‘कर्वे पेपरवाले’
गेल्या ८० वर्षांत तीन पिढ्यांच्या माध्यमातून अलिबागकर वृत्तपत्र वाचकांच्या मनावर ‘कर्वे पेपरवाले’ असे नाव कोरणारे मुकुंद पुरुषोत्तम तथा राजाभाऊ कर्वे हे अलिबागचे आद्य वृत्तपत्र वितरक. त्यांची तिसरी पिढी आज कार्यरत असून, वृत्तपत्र व्यवसायातील नव्या आव्हानांना ते आधुनिक तंत्राने सामोरे जाऊन मूळ व्यवसाय वृद्धिंगत करीत आहेत. १९७० मध्ये अलिबागमध्ये १२०० वृत्तपत्र वितरीत होत असत. आज ही संख्या १५ हजारांच्यावर गेली आहे. तालुक्यांत २० स्टॉलच्या माध्यमातून, तर ४० जणांना व्यक्तिगत असे ६० रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. आॅनलाइनच्या जमान्यातही वृत्तपत्रांना मागणी असल्याची माहिती संजय कर्वे यांनी दिली.

वृत्तपत्र आणि वाचक यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम वृत्तपत्रविक्रेता करत असतो. खऱ्या अर्थाने वाचन चळवळ टिकवण्यासाठीचे हे योगदान उल्लेखनीय आहे. ५० वर्षांपूर्वी ही चळवळ उभारली होती. या कालावधीत बरेच चढ-उतार आले; परंतु हा व्यवसाय काही सोडला नाही. आज आमची दुसरी पिढी या व्यवसायामध्ये त्याच उत्साहाने उतरली आहे.
- राजेंद्र मेहता, पाली


वृत्तपत्र विकताना प्रत्येक वेळेला नवीन व्यक्ती (वाचक) जोडत गेलो. २० वर्षांत खूप मोठा वाचकवर्ग उभारता आला आहे. आताच्या नवीन पिढीला वाचनाची गोडी लागावी, यासाठी विशेष करून प्रयत्न झाले पाहिजेत.
- संदीप पानवलकर, महाड


२५ वर्षांपूर्वी सुरू केलेला व्यवसाय असाच अविरतपणे सुरू आहे. या व्यवसायाच्या जीवावर आजपर्यंत बरेच व्यावसायिक मोठे झालेले पाहिले. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता वृत्तपत्र वेळेत वाचकांपर्यंत कसे पोहोचेल याचाच अधिक विचार केला.
- किशोर वाडिया, श्रीवर्धन

७१ वर्षांपासून वृत्तपत्र वितरणात ध्रुव मेहेंदळे
खोपोलीसारख्या ठिकाणी, १९४७ पासून जवळपास ७१ वर्षांपूर्वी ५० वर्तमानपत्रे घेऊन ती टाकण्याला सुरुवात करणारे बापूसाहेब मेहेंदळे यांचा व्यवसाय आज त्यांचे सुपुत्र ध्रुव शंकर मेहेंदळे यांनी ५००० वर्तमानपत्रांपर्यंत वाढवला आहे. ध्रुव मेहेंदळे हे गेली ५५ वर्षे या व्यवसायात आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरु वात केली. पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होणारा त्यांचा दिवस हा रात्री ११ वाजता संपतो. खोपोली न्यूज पेपर एजन्सीमध्ये सकाळी लवकर उठून, ३० मुले पेपर टाकण्याचे काम त्यांच्याकडे करत आहेत. विविध ६ भाषांमधील ५५ प्रकारचे ५ हजार पेपरचे रोज वितरण होते. गेली २० वर्षे ध्रुव मेहेंदळे हे पेपर टाकणाºया मुलांना व कर्मचाºयांना सहलीसाठी घेऊन जातात. कोणत्याही व्यवसायामध्ये लागणारा सचोटी आणि प्रामाणिकपणा हा मेहेंदळे यांच्याकडे दिसून येतो.

Web Title: 'Newspaper contribution to save reading movement'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत