शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एसटीच्या इतिहासातील ‘ती काळरात्र’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 11:58 PM

माझी एसटी, मी एसटीचा

रत्नपाल जाधव

ऑगस्ट २०१६ ची अमावस्येची ती भयाण पावसाळी रात्र. एसटीच्या इतिहासातील काळरात्र होती. त्या दिवशी संपूर्ण कोकणपट्ट्यासह महाबळेश्वर व सातारा परिसरांत पावसाने अगदी थैमान घातले होते. पोलादपूर व महाडमध्ये असलेल्या सावित्री नदीने उग्ररूप धारण केले होते. सावित्रीच्या पुराच्या पाण्याला जणू काही उधाण आले होते. सावित्री नदीचा रुद्रावतार इतका भयंकर होता की, तिच्या लाटांच्या माऱ्यापुढे १०० वर्षे जुना असलेला पूल रात्री ११.३० च्या सुमारास ढासळला. नुसता ढासळलाच नाही तर सावित्री नदीच्या पोटात त्या काळ्याकुट्ट अशा मिट्ट अंधारात एसटी महामंडळाच्या दोन व तीन छोट्या वाहनांना व त्यातील एकूण जवळपास ४० निष्पाप लोकांचा बळी घेतला. आजच्या दिवशी या दुर्दैवी घटनेला तीन वर्षे झाली आहेत. शासनाने ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत नवीन पूल जरी उभारला असला, तरी त्याने आमचे गेलेले एसटी कर्मचारी व एसटीतून प्रवास करणारे १८ प्रवासी, तर परत येणार नाहीत ना? या निष्पाप जीवांनीच नाही तर त्यांच्या स्वप्नांनीही सावित्रीच्या गर्भात कायमची जलसमाधी घेतली.

चिपळूण बसस्थानकात बहुतांश मुंबईच्या दिशेने जाणाºया चालक-वाहकांची ड्युटी बदलत असते. त्याप्रमाणे साधारणपणे रात्री ९.३० च्या सुमारास जयगड-मुंबई ही गाडी तसेच राजापूर-बोरिवली ही गाडी, या गाड्यांनी चिपळूण सोडलं व मुंबईच्या दिशेने नेहमीप्रमाणे निघाल्या. पण, नियतीच्या मनात मात्र भलतंच होतं. दोन्ही गाड्यांत चालक-वाहक धरून एकूण २२ प्रवासी होते. पाऊस तर आभाळ फाटल्यागत धोधो कोसळत होता. पावसाच्या त्रासामुळे खिडक्यांच्या काचा प्रवाशांनी बंद केलेल्या होत्या. पोलादपूर सुटलं. रस्त्यावर खूप पाऊस असल्याने वाहने तशी मंदगतीनेच पुढे सरकत होती. वाहनांची गर्दीही पावसामुळे तुरळक होती. सावित्री नदीच्या लाटा पुलाला हादरे देत होत्या. एसटीच्या या दोन गाड्या व एक चारचाकी गाडी पुलाच्या काही अंतरावर मध्यभागी आल्यावर पूल ढासळला व क्षणार्धात दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी सावित्रीच्या प्रवाहात गायब झाल्या.पुलावर काहीतरी भयंकर घडतंय, हे जिथून पुलाची सुरुवात होते, तेथे असणाºया गॅरेजमध्ये काम करणाºया वसंत कुमार या मेकॅनिकच्या लक्षात आलं आणि भररस्त्यावर येऊन त्याने आपल्या मित्रांसह मागून येणाºया गाड्यांना वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला. वसंत कुमारने केलेल्या संपर्कामुळे सर्व आपत्कालीन व्यवस्था जागी झाली. वसंत कुमारच्या रूपाने जणू देवदूतच त्या दिवशी धावून आला, अन्यथा अजून बरेच जीव सावित्रीच्या पोटी गडप झाले असते. गुहागर-बोरिवली ही एसटीही त्याचदरम्यान या पुलाजवळ आली होती. पण, पुढे घडलेला प्रसंग पाहता वाहक डी.जी.जाधव व चालक एस.एम.केदार यांनी याही प्रसंगात प्रसंगावधान दाखवत मागून येणाºया सर्व वाहनांना थांबवलंच आणि इतरही मागोमाग येणाºया एसटीचालकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

एसटीच्या गाड्या जेव्हा प्रवासाला निघतात, तेव्हा या एसटींची प्रत्येक बसस्थानकात पोहोचण्याची वेळ साधारण ठरलेली असते. तशी स्थानकप्रमुखाच्या नोंदवहीत चालकाकडून नोंद केली जाते. पोलादपूरहून निघताना या दोन्ही एसटीच्या वाहनांची नोंद चालकाकडून केली गेली होती, पण नियोजित वेळेत या दोन्ही गाड्या महाडला न आल्यामुळे व सावित्रीचा पूल ढासळल्याची बातमी पसरल्यामुळे निश्चितच या गाड्या सावित्री पात्रात वाहून गेल्या असाव्यात, याबाबतच्या शंकेला दुजोरा मिळाला. तब्बल १० तासांनंतर सर्च आॅपरेशन सुरू झालं. धोधो कोसळणारा पाऊस, सावित्रीच्या तुफान उसळणाºया लाटा, नदीच्या पात्रात असलेला मगरींचा वावर या प्रतिकूल परिस्थितीत एनडीआरएफ, नौदल, हेलिकॉप्टर्स, कोस्ट गार्डच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन सुरू केलं. अनेक प्रयत्न करून अखेर गाळात खोल अडकलेल्या दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी गाडी शोधण्यात यश आलं.गेले काही दिवस कोकण व मुंबईत तुफान पाऊस पडतोय आणि त्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अशी बातमी ऐकायला मिळाली की, या दुर्घटनेची आठवण ताजी होते.२ आॅगस्ट २०१६ ची भयाण अमावस्येची रात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी न विसरता येणारी. त्या रात्री सावित्री नदीच्या लाटांच्या रुद्रावताने १०० वर्षे जुन्या पुलाला आपल्या पोटात सामावून घेतले आणि या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसेससह तीन छोट्या वाहनांना आणि त्यातील सुमारे ४० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली. सुमारे १०-१२ दिवस इथे रेस्क्यू आॅपरेशन चाललं. त्यानंतर ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत शासनाने नवीन पूल उभारला. पण, आजही सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली म्हटलं की, अनेकांना या दुर्घटनेची आठवण होते. जयगड-मुंबई गाडीचे चालक श्रीकांत कांबळे व त्यांचा मुलगा महेंद्र मात्र खूप दुर्दैवी ठरले. खरेतर, कांबळे मुंबई रूट कधीच करत नव्हते. केवळ मुंबईला मुलगा महेंद्रचे इंजिनीअरिंगचे अ‍ॅडमिशन दुसºया दिवशी माटुंगा येथे करायचे होते, म्हणून आगार व्यवस्थापकांना विनंती करून कांबळेंनी या रूटवर ड्युटी मागून घेतली होती. पण, सावित्री नदीने या दोघा पितापुत्राच्या स्वप्नांनाही वाहून नेलं होतं. चालक कांबळे २०१८ ला एसटी सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. 

टॅग्स :riverनदीRainपाऊसRaigadरायगड