कौतुकास्पद ! लोकसहभागातून उभारली नऊ तलाठी कार्यालये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 02:12 AM2019-12-24T02:12:48+5:302019-12-24T02:13:24+5:30

शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार : पनवेल, उरणमध्ये लवकरच लोकार्पण

Nine Tallahassee offices set up by the public | कौतुकास्पद ! लोकसहभागातून उभारली नऊ तलाठी कार्यालये

कौतुकास्पद ! लोकसहभागातून उभारली नऊ तलाठी कार्यालये

Next

वैभव गायकर

पनवेल : लोकसहभागातून पनवेल उरण तालुक्यातील नऊ हायटेक तलाठी कार्यालये उभारण्यात आली आहेत. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या संकल्पनेतून दोन्ही तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तलाठी कार्यालयाशी संबंधित शेतकऱ्यांची कामे त्यांच्या गावातच होणार असून, पनवेल अथवा उरण शहरात कामानिमित्त खेटे मारण्यापासून शेतकºयांची मुक्तता होणार आहे.

नऊ तलाठी कार्यालयांमध्ये पनवेल तालुक्यातील पोयंजे, असूडगाव, पालेखुर्द, मोहो, वावंजे, पनवेल १ व २ अशा सात तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. उरण तालुक्यात बोरले व विंधणे या दोन तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. संबंधित तलाठी कार्यालये पूर्णपणे लोकसहभागातून उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ, राजकीय पदाधिकारी, समाजसेवक, बांधकाम व्यावसायिक आदींनी हातभार लावला आहे. तलाठी कार्यालयात सातबारा, फेरफार नोंदी, शेतसारा कर, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे, ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रभाग रचना आदींसह तहसीलदारांच्या आदेशानुसार शासकीय कामे तलाठी कार्यालयातून चालतात.
शेतीशी संबंधित लहान सहान कामांसाठीदेखील शेतकºयांना तलाठी कार्यालय गाठावे लागते. गावात कार्यालये नसल्याने त्यांना थेट पनवेल अथवा उरण शहर गाठावे लागत आहे. काही वेळेला तलाठी कार्यालयात नसल्याने शेतकºयांना रिकाम्या हाती परतावे लागते. याकरिता सध्या त्या ठिकाणी तलाठी कार्यालय उभारण्याचा मानस प्रांत अधिकारी नवले यांनी आखला. याची सुरुवात करण्यात आली असून, भविष्यात पनवेल तालुक्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी तलाठी कार्यालय उभारले जाणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात मोठ्या संख्येने सरकारी जागेवर अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी कार्यालय उभारण्यासाठी अशाच सरकारी जागेची निवड करण्यात आली आहे, जेणेकरून सरकारी जागेवरील अतिक्रमणांवरदेखील आपोआपच आळा बसणार आहे.

आॅनलाईन सातबारा मिळणार
१ तलाठी कार्यालयांचे जवळ जवळ ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्याच्या घडीला या कार्यालयात फर्नीचरचे काम सुरु आहे. २३ डिसेंबर रोजी प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांनी पोयंजे व बोरले गावातील तलाठी कार्यालयांची पाहणी केली.
२डिसेंबर महिन्याअखेर या सर्व कार्यालयांची कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर या कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यालयात इंटरनेटची व्यवस्था असल्याने शेतकºयांना आॅनलाईन सातबारा आदींसह विविध शासकीय कागदपत्रे या कार्यालयातून काढता येणार आहेत.

शेतकºयांना मिळाला दिलासा
च्पनवेल तालुक्यातील पोयंजे, असूडगाव, पालेखुर्द, मोहो, वावंजे, पनवेल १ व २ अशा सात तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. तर उरण तालुक्यात बोरले व विंधणे या दोन तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

संपूर्ण लोकसहभागातून साहित्य स्वरूपाची मदत घेऊन हि तलाठी कार्यालये उभारण्यात आली आहेत. शेतकºयांना गावातल्या गावातच अधिकारी उपलब्ध व्हावेत यादृष्टीने आमचे प्रयत्न होते. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी शेतकºयांना फेºया माराव्या लागणार नाहीत. संबंधित कार्यालये उभारण्यासाठी मदत करणाºया प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत
- दत्तात्रय नवले, प्रांत अधिकारी , पनवेल
 

Web Title: Nine Tallahassee offices set up by the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड