रायगड जिल्ह्यातील नऊ तालुके कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:27 AM2021-01-13T02:27:32+5:302021-01-13T02:27:47+5:30
आणखी पाच तालुक्यांची काेराेनामुक्तीकडे वाटचाल
आविष्कार देसाई
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये काेराेनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये काेराेनाचा प्रत्येकी एकच रुग्ण सापडल्याने या तालुक्यांची काेराेनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ८ मार्च २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला हाेता. त्यानंतर काेराेनाचा फैलाव झपाट्याने जिल्ह्यात झाला. विविध सणांमुळे नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने काेराेनाचा कहर वाढल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली हाेती. जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काेराेना रुग्णांच्या आकड्याने सर्वांच्याच काळजाचा ठाेका चुकवला. सरकार आणि प्रशासनही ताडकन जागे झाले. आराेग्य व्यवस्था सुधारताना त्यांनी काेराेनाविषयक जनजागृतीवर भर दिला तसेच मास्क, सॅनिटाययझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम कडक केले. तसेच जिल्हाबंदी करताना गावात प्रवेश करताना काेराेनाची टेस्ट अनिवार्य केली. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्यास मदत झाली. नागरिकांनीही काेराेनाविषयीचे नियम पाळत आराेग्य व्यवस्थेला मदत केली.
अचानक रुग्ण सापडत असल्याने चिंता
११ जानेवारीच्या आकेडवारीनुसार ९ तालुक्यांमध्ये काेराेनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या एक अंकी झाली आहे. हे तालुके काेराेनामुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहेत. मात्र एखाद दिवशी एकही रुग्ण नसणाऱ्या तालुक्यात अचानक रुग्ण सापडत आहे.