निखिल म्हात्रे/ मनोज मुळ्ये/महेश सरनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग/रत्नागिरी/सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकटातच बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे शेती, आंबा, नारळी, पोफळीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या वादळामुळे घरे, गोठे, झाडे, तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच संकटात सापडलेले कोकणवासीय या वादळामुळे आणखी संकटात पडल्याचे चित्र आहे.
रायगडमध्ये पाच लाख घरांची पडझडरायगड जिल्ह्यात दोन-तीन तालुके वगळता अन्य सर्व ठिकाणी चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे पाच लाख घरांची पडझड झाली आहे. पावणेदोन लाखांहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, तारा तुटून पडल्या आहेत. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुरुस्ती-मदतकार्यात अडथळे येत आहेत. सहा हजार ७६६.२२ हेक्टरमधील शेती आणि आंबा, नारळी, पोफळीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका वीजपुरवठ्याला आणि मोबाईल, इंटरनेट नेटवर्कला बसला आहे. नुकसानीचा आकडा २५० कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिंधुदुर्गात घरांनावादळाचा फटकासिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळ येथे धडकले नसले तरी त्याचा फटका मात्र जिल्ह्यात सर्वदूर कमीजास्तबसला आहे. मागील दोन दिवससुरू असलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणीझाडे घरांवर आणि वीज खांबांवर पडली आहेत. त्याचा ३२ घरांनाफटका बसला आहे. करूळघाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या असून ते हटविण्याचे काम सुरू आहे.९३ टक्के आपद्ग्रस्तघरे दापोली, मंडणगडचीया वादळाचा मोठाफटका रत्नागिरी जिल्ह्यातीलदापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना बसला. जिल्ह्यात२७ हजार ७८२ घरांचे नुकसानझाले. त्यात ९३ टक्के घरी दापोलीव मंडणगड तालुक्यांतीलआहेत.दापोली, मंडणगडला सर्वाधिक नुकसानरत्नागिरी : जिल्ह्यात २७,७८२ घरांची पडझड झाली आहे. ११ जनावरे मृत झाली असून, ३२०० झाडे पडली आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या २७,७८२ घरांपैकी दापोली तालुक्यातील तब्बल १८ हजार व मंडणगड तालुक्यात आठ हजार घरे आहेत. खेड तालुक्यातील १२६ गावांचे ५७८१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणचे ९६० विजेचे खांब कोसळले आहेत. सुमारे पाच हजार लोकांना अगोदरच स्थलांतरीत केल्याने मनुष्यहानी झाली नाही. शाळा, शासकीय इमारती, गोदामे, समाजमंदिर यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पंचनामे सुरू: वादळ संपताचसर्वत्र पंचनाम्यांना प्रारंभ झाला असून,अजूनही ते सुरू आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील नुकसानीचा निश्चित असा आकडा अजून स्पष्ट झाला नसला तरी त्याची व्याप्ती पाहता, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.‘विशेष पॅकेजची मागणी’नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, विशेष पॅकेजची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.