आविष्कार देसाई
अलिबाग - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सात तालुक्यांतील सागरी तसेच खाडी किनार्यावरील एक लाख 73 नागरिक प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एवढ्या माेठ्या संख्येने नागरिकांचे स्थलांतर करणे प्रशासनासमाेर माेठे आव्हान ठरणार आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती झाली आहे. निसर्ग असे या वादळाला नावं देण्यात आलं आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा प्रामुख्याने अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या सात तालुक्यांतील किनार्यालगतच्या गावांना बसणार आहे. येथील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धाेक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. माेठ्या संख्येने नागरिक स्वतःच सुरक्षित स्थळी जाण्यास तयार झाले असल्याने प्रशासनावरील ताण कमी हाेणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले हाेते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा हा प्रामुख्याने श्रीवर्धन-हरिहरेश्वरला बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला हाेता, मात्र त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाने आपला माेर्चा हा अलिबागकडे वळवल्याने अलिबागकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या रायगड जिल्ह्यात पाठवण्यात आल्या आहेत. अलिबागला दाेन आणि हरिहरेश्वरला एक तुकडी तैनात केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली. त्याचप्रमाणे उरण येथे नागरी संरक्षण दल आणि मुरुड येथे काेस्टगार्ड आपत्तीवर लक्ष ठेवून राहणार आहेत. आपत्ती कालावधीत मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलामध्ये सुमारे 25 स्वयंसेवी संस्था तत्पर राहणार आहेत.
-----------
रायगड किनारपट्टीवरील 60 गावांमध्ये सुमारे 1 लाख 73 हजार नागरिक राहत आहेत. येथे कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने धाेक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या 60 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सकाळपासूनच सुरू केली आहे.
हेही वाचा
ठाकरे कॅबिनेटनं घेतले ६ महत्त्वाचे निर्णय, सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ
PLAचं सैन्य LAC जवळ पोहोचलं, अमेरिकेचा चीनला इशारा अन् भारताला सतर्कतेचा सल्ला
लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य
राज्यात सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा सक्तीची, ठाकरे सरकारचा निर्णय
CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी