नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: आरोपींनी मागितली ८ दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 09:42 AM2023-08-15T09:42:28+5:302023-08-15T09:43:06+5:30
आता आठ दिवसांनंतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईसीएल फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व इतर आरोपींनी १४ ऑगस्ट रोजी हजर न राहता आठ दिवसांची वाढीव मुदत द्यावी, अशी विनंती मेलद्वारे केली होती. त्यानुसार पोलिसांनी आठ दिवसांनी हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आठ दिवसांनंतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.
८ आणि ११ ऑगस्टला आरोपींची नऊ तास खालापूर पोलिस ठाण्यात चौकशी झाली. १४ ऑगस्टला पुन्हा चौकशीला हजर राहण्याची नोटीस दिली होती. संबंधितांनी न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले आहे. त्याची सुनावणी १८ ऑगस्टला होणार आहे.