ई-पास नसल्यास रायगड जिल्ह्यामध्ये नो-एन्ट्री; येणाऱ्यांची पोलीस करतात तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:09 AM2021-04-29T00:09:07+5:302021-04-29T00:09:19+5:30

येणाऱ्यांची पोलीस करतात तपासणी; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेतली जातेय खबरदारी

No entry in Raigad district without e-pass | ई-पास नसल्यास रायगड जिल्ह्यामध्ये नो-एन्ट्री; येणाऱ्यांची पोलीस करतात तपासणी

ई-पास नसल्यास रायगड जिल्ह्यामध्ये नो-एन्ट्री; येणाऱ्यांची पोलीस करतात तपासणी

googlenewsNext

निखिल म्हात्रे

अलिबाग : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूची चेन ब्रेक करण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. ई-पास नसेल तर अत्यावश्यक सेवा वगळता पोलीस कोणालाही जिल्ह्यात येऊच देत नाहीत.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने उग्ररूप धारण केल्यानंतर राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक चेकिंग पाॅइंटवर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच एखाद्याकडे ई-पास नसल्यास त्याच्यावर कारवाई करीत माघारी पाठवत आहेत. त्यामुळे आता बाहेरून येणारे या कारवाईला घाबरत आहेत हे नक्की. तर दुसरीकडे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आहे. तसेच शहरात दाखल होणाऱ्यांना ई-पास तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याचे सध्या दिसून येत आहे.

 

Web Title: No entry in Raigad district without e-pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.