अविष्कार देसाई
मुंबई - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्मावी यांनी केवळ बिस्कीटावर दोन रात्री काढल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोस्वामी कोठडीत अस्वस्थ झाले असून त्यांना त्रास होत आहे. त्यातच, रात्री मच्छरांनी झोपू दिलं नाही, कारागृह प्रशासनाने नवे कपडे दिले नाहीत आणि चवीचं जेवण न मिळाल्याने काही खाताही आलं नाही. एवढी कमी होतं म्हणून, कोविडच्या कठोर नियमांनी कुणी भेटायलाही आलं नाही. नेहमी लक्झरीयस आणि फाईव्ह स्टार लाईफ जगणाऱ्या गोस्वामींवर आता ही वाईट वेळ आली आहे.
अलिबागमधली एका शाळेत दोन रात्र अर्णब गोस्वामींना मुक्काम करावा लागला. याच शाळेतल्या एका खोलीत गोस्वामी सर्वसामान्य आरोपीसारखेच राहत आहेत. उप-कारागृहाच्या घोलीत एक पंखा आणि खाट इतकीच काय ती सोय करण्यात आली आहे. मात्र, एकाच पंख्याच्या भरोशावर असलेल्या गोस्वामींना शुक्रवारच्या रात्री डासांनी हैराण करुन सोडल्याचं सुत्रांनी सांगितलं. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता इतर कैद्यांप्रमाणे ते उठले, पण आंघोळीसाठी उप कारागृहाचं पाणी चालत नसल्याने त्यांनी बिना अंघोळीचं राहणं पसंत केलं. विशेष म्हणजे, गोस्वामी यांनी उप कारागृह प्रशासनाकडे मिनरल वॉटरची आणि बाहेरच्या जेवणाची मागणी केली होती. मात्र, त्यांची एकही मागणी पूर्ण न झाल्याने केवळ बिस्कीटं खाऊन त्यांना कारागृहात रात्र काढावी लागली आहे.
समोर जेवण आहे, पोटात भूक आहे, पण खाता येत नाही.. पाणी आहे, पण मिनरल नाहीये... त्यामुळे प्यायलाही येत नाही. टेलिव्हीजनवरुन पुछताँ है भारत... असं म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींना सध्या पुछता है तुरुंगाधिकारी ... अशी केविलवाणी अवस्था अर्णब गोस्वामी यांची झाली आहे. स्टार आणि झगमगाटाचं आयुष्य जगणाऱ्या अर्णब यांना तात्पुरत्या स्वरुपातील या कारागृहात गुदमरल्यासारखं होत असल्याचं तेथील सुत्रांनी सांगितलं.