कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही- सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 11:40 PM2020-06-21T23:40:53+5:302020-06-21T23:42:01+5:30
तरीही कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा.सुनील तटकरे यांनी दिली.
म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा या भागातील सर्वसामान्य जनतेचे फार मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे प्रमाण मोठे असले, तरीही कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा.सुनील तटकरे यांनी दिली.
वादळामुळे सर्वसामान्य शेतकरी, तसेच बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील घरांचीदेखील पडझड झाली आहे. या नुकसानीचा व उपाययोजनांचा आढावा खा.तटकरे यांनी घेतला. निसर्गच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यासाठी आजपर्यंत २६ कोटी रुपये तहसीलदार म्हसळा यांच्याकडे वर्ग झाले असल्याचे सांगतानाच, आंबा फळ बागायतींना नवीन निकषानुसार भरपाई मिळेल असे स्पष्ट के ले.
>पुुनर्लागवडीसाठी व कलमे तीन वर्षे जगविण्यासाठी मनरेगा योजनेचा लाभ मिळणार आहे. नारळ, सुपारी, तसेच कोळी बांधवांना मदतीच्या नवीन निकषाची मागणी करण्यात येत असल्याचे खा.सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तहसीलदार शरद गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
समीर बनकर आदी उपस्थित होते.