पनवेल : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर होत आहेत. तर, अद्यापही अनेक उमेदवार वेटिंग लिस्टवर आहेत. जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. अद्यापही शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या नावांची संपूर्ण यादी जाहीर झाल्यानंतरच इतर उमेदवार आपले नामनिर्देशन दाखल करतील. तसेच, 4 तारखेपर्यंत उमेदवांना आपले अर्ज दाखल करणे, बंधनकारक आहे.
नामनिर्देशित करण्यात आलेले मतदारसंघ आणि उमेदवार188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 2 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. अरुण राम म्हात्रे (अपक्ष), फुलचंद मंगल किटके (बहुजन समाज पार्टी).189-कर्जत, विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. ॲड गोपाळ गुंजा शेळके (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)190-उरण, विधानसभा मतदार संघामध्ये 3 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.कौशिक छोटालाल शहा उर्फ शाह (अपक्ष), श्री.संतोष मधुकर पाटील (बहुजन समाजपार्टी), श्री.महेश रतनलाल उर्फ रतनशेठ बालदी (अपक्ष).194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये 1 नामनिर्देशन सादर झाले असून ते पुढील प्रमाणे. श्री.भरत मारुती गोगावले (शिवसेना). तर 192-अलिबाग, 191-पेण, 193-श्रीवर्धन या विधानसभा मतदार संघात आज एकही नामनिर्देशन सादर झाले नाही