मराठी पाट्या न लावणाऱ्यांना 351 दुकानांना नोटिसा; पनवेल महानगरपालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 09:25 PM2023-11-27T21:25:17+5:302023-11-27T21:25:29+5:30

उपायुक्त गणेश शेटे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या.

Notices to 351 shops for not putting up Marathi plates; Panvel Municipal Corporation action | मराठी पाट्या न लावणाऱ्यांना 351 दुकानांना नोटिसा; पनवेल महानगरपालिकेची कारवाई

मराठी पाट्या न लावणाऱ्यांना 351 दुकानांना नोटिसा; पनवेल महानगरपालिकेची कारवाई

पनवेल: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ 'क' नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे आदि प्रकारच्या प्रत्येक आस्थापनेचा,दुकानाचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील 351 दुकाने व आस्थापानांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 

ज्या आस्थापनांनी अजूनही अमराठी पाट्या बदलल्या नाहीत अशा आस्थापनांचा प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण सुरु असून सदर आस्थापनांना महापालिकेकडून कारवाईच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. गेल्या शनिवारपासुन नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून प्रभाग अ, ब, क ड मधील  सुमारे 351 दुकाने तसेच आस्थानांना आत्तापर्यंत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.उपायुक्त गणेश शेटे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचनाही दिल्या होत्या.

नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक हे ठळक मराठी (देवनागरी) लिपीत तर असावाच त्याचप्रमाणे इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार दि.25 नोव्हेंबर पर्यंत दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत  कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून यापुढेही नोटीसा बजावण्याची कार्यवाही सुरूच राहणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

Web Title: Notices to 351 shops for not putting up Marathi plates; Panvel Municipal Corporation action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल