पाणीबचतीसाठी गावांना नोटिसा

By admin | Published: April 4, 2016 02:04 AM2016-04-04T02:04:24+5:302016-04-04T02:04:24+5:30

सिडको वसाहती, पनवेल नगरपालिका, एमआयडीसी परिसरात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही परिस्थिती फारशी वेगळी नाही.

Notices to the villages for water conservation | पाणीबचतीसाठी गावांना नोटिसा

पाणीबचतीसाठी गावांना नोटिसा

Next

कळंबोली : सिडको वसाहती, पनवेल नगरपालिका, एमआयडीसी परिसरात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातही परिस्थिती फारशी वेगळी नाही.
मोर्बे धरणातून नवी मुंबई महानगरपालिका शहराला पाणीपुरवठा करते. त्याचबरोबर कामोठे वसाहतीसह पनवेल तालुक्यातील जलवाहिनीलगतच्या काही गावांना सुध्दा पाणी दिले जाते. गेल्या वर्षी पावसाळ्यात धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने मोर्बे धरणातील पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत नवी मुंबई शहराला पुरवायचे मोठे आव्हान नवी मुंबई महापालिकेसमोर आहे. त्यामुळे पाणीकपातीचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. त्यानुसार आदई, विचुंबे, सुकापूर, शिवकर, चिखले याशिवाय काही गावांना सुध्दा पाणी कपात करण्यात आले आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
पनवेलमधील काही गावांना नवी मुंबई महापालिकेकडून चार एमएलडी पाणी दिले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मंगळवार आणि शुक्र वार हे दोन दिवस पाणीकपात करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावातील जलकुंभामध्ये पाणी साठवून ते रहिवाशांना पुरवले जात आहे. एकूण 30 टक्के पाणीकपात करण्यात आल्याने ग्रामपंचायती सुध्दा खडबडून जाग्या झाल्या आहेत. त्यांनी पाणीबचतीकरिता पुढाकार घेऊन प्रबोधन आणि जागृती सुरू केली आहे. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन सुध्दा केले आहे. याबाबत आम्ही ग्रामस्थांना सूचना दिल्या असल्याची माहिती विचुंबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जे. सी. चौरकर यांनी दिली.
(वार्ताहर)

Web Title: Notices to the villages for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.