आता लगबग आदिशक्तीच्या आगमनाची; बुधवारी होणार घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:05 AM2018-10-08T06:05:01+5:302018-10-08T06:05:10+5:30

गणेशोत्सवानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. बुधवार, १० आॅक्टोबर रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एक हजार २८६ घट स्थापन केले जाणार आहेत

 Now the arrival of Adabha Shakti; Will be closed on Wednesday | आता लगबग आदिशक्तीच्या आगमनाची; बुधवारी होणार घटस्थापना

आता लगबग आदिशक्तीच्या आगमनाची; बुधवारी होणार घटस्थापना

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : गणेशोत्सवानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते नवरात्रोत्सवाचे. बुधवार, १० आॅक्टोबर रोजी आदिशक्तीचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एक हजार २८६ घट
स्थापन केले जाणार आहेत. त्यामध्ये एक हजार १०८ सार्वजनिक तर,
१७८ खासगी देवींच्या मूर्तींचा
समावेश आहे. नवरात्रोत्सवानिमित्त बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी होत
आहे. आदिशक्तीच्या आगमनाच्या तयारीसाठी नवरात्रोत्सव मंडळांचीही चांगलीच लगबग सुरू असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव ज्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो, त्याच आपुलकीने आणि भक्तिभावाने आदिमायेचा
जागर सलग नऊ दिवस घातला
जातो. आदिशक्तीचा हा उत्सव हा स्त्रीत्वाचा उत्सव असल्याने नवरात्रोत्सवात महिलांचाच दबदबा असल्याचे पाहायला मिळते. महिलांसाठी असणारा सण हा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. मोठ्या जल्लोषात सण साजरा करायचा म्हटला की, त्या सणासाठीची तयारीही तेवढीच उत्साहपूर्ण असली पाहिजे. यासाठी महिलावर्गाची तयारी सुरू आहे. नऊ दिवस भरणाऱ्या या उत्सवामध्ये गरबा, दांडिया मनमुरादपणे खेळला जातो. त्यामुळे नऊ दिवसांचा ड्रेसअपही तसाच पाहिजे, तसेच त्यासाठी मॅचिंग ज्वेलरी, सँडल हे सुद्धा आलेच. या सर्वांच्या तयारीसाठी लागणारी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी दिसून येत आहे.
सध्या महिला कॉन्ट्रास ड्रेसअप करण्याला पसंती देत असल्याचे दिसून येते. बाजारामध्ये असंख्य व्हेरायटीच्या साड्या, घागरा-चोली, लाचा, राजस्थानी पेहराव विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या दांडिया, ओढण्याही खरेदी करण्याची चांगलीच धूम आहे.
हार-फुले, फळे, अगरबत्ती, धूप अशा पूजेच्या साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. घट स्थापनेसाठी लागणारी रंगबेरंगी मडकी, देवीचे मुखवटे यांनाही चांगली मागणी आहे.
बुधवार, १० आॅक्टोबर रोजी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आदिशक्तीची स्थापना करण्यात येणार आहे. एक हजार २८६ घट स्थापन केले जाणार आहेत.
त्यामध्ये एक हजार १०८ सार्वजनिक तर, १७८ खासगी मूर्तींचा समावेश आहे. नऊ दिवस अलिबाग येथील काळंबा मंदिर परिसरामध्ये जत्रा भरणार आहे. रायगड जिल्ह्यातील आसपासचे देवीचे भक्तगण येथे मोठ्या संख्येने
भेट देतात. चौल येथील शितळा
देवी मंदिर, नागाव येथील दक्षिणमुखी देवीच्या मंदिर परिसरातही भाविकांची चांगलीच गर्दी होते. त्यामुळे मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार
आहे. दरम्यान, नवरात्रोत्सव
अतिशय भक्तिमय आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा
यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे.

पनवेलमध्ये दुकाने सजली
पनवेल : दोन दिवसांत आदिशक्तीचे आगमन होणार असल्याने नवरात्रोत्सवानिमित्त पनवेलमधील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची लगबगही सुरू झाली आहे. याशिवाय पनवेलला लागूनच असलेल्या नवी मुंबई शहरातील नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आदी भागातील बाजारपेठा नवरात्रोत्सवासाठी लागणाºया साहित्यांनी सजल्या आहेत.

नवरात्रोत्सवामध्येही
डीजेवर बंदी कायम!
नवरात्रोत्सवामध्ये, तसेच मिरवणुकीच्या वेळेस डीजेवर बंदी कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे नऊ दिवस चालणाºया देवीच्या उत्सव कालावधीतही त्याचा वापर करता येणार नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये देवीचा उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील नियमित बंदोबस्त तैनात राहणार आहे. शिवाय त्यांच्या मदतीला होमगार्डही राहणार आहेत.
मुख्यालयाच्या ठिकाणी दोन स्ट्रायकिंग फोर्स ठेवण्यात येणार आहे. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ व माणगाव या दोन ठिकाणी आरसीपी फोर्स तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.

Web Title:  Now the arrival of Adabha Shakti; Will be closed on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड