- जयंत धुळप अलिबाग : मतदानाच्या दिवशी २३ एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातील १५० संवेदनशील मतदान केंद्रे तर २९ एप्रिल रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्हा क्षेत्रातील १३२ संवेदनशील मतदान केंद्र अशा एकूण २८२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती रायगड बीएसएनएलचे अभियंता दीपक महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्याच्या हेतूने, प्रथम ईव्हीएम मशिनवरील संशय दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट प्रणाली सुरू केली आणि आता मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवरील हालचाली, सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेबकास्टिंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षणाखाली राहणार आहेत.२०१४ च्या निवडणुकांमध्ये वेबकास्टिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रथम करण्यात आला, त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढल्याचे निष्कर्ष निवडणूक आयोगास प्राप्त झाल्याने या वेळी वेबकास्टिंगची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती रायगड निवडणूक यंत्रणेच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.संवेदनशील मतदान केंद्रावरील मतदान काळातील हालचाली पाहण्यासाठी आतापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध होती. आता सामान्य मतदारांसाठीसुद्धा ही सेवा निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर देण्यात येणाºया लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर सीसीटीव्हीही नजर ठेवणार आहे. वेबकास्टिंगमुळे ही केंद्रे आॅनलाइन होणार आहेत. वेबकास्टिंगची लिंक आयोगाच्या वेबसाइटवर दिली जाणार असल्यामुळे प्रत्येक जण मतदान केंद्रावरील हालचालींवर नजर ठेवू शकणार आहे. यामुळे मतदान केंद्रावरील स्थिती बघता येणार आहे.>निवडणुकांच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडल्यास, त्याची माहिती देण्यासाठी १९५० ही टोल फ्री सेवा मतदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी राज्य निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाशी जोडलेली ही सेवा आता थेट संबंधित जिल्हा नियंत्रण कक्षास जोडली आहे. परिणामी, कार्यवाही तत्काळ होऊ शकते, त्यामुळे निवडणूक आयोग आता पोलीस आणि अग्निशमन केंद्रांप्रमाणे जिल्हास्तरावर १९५० ही टोल फ्री दुरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे.>इंटरनेट सेवा बंद पडली, तरी मतदान केंद्रावरील कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग सुरूच राहणाररायगडमधील १५० आणि मावळमधील २८२ संवेदनशील मतदान केंद्रांवर चित्रीकरणाकरिता कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हे सर्व कॅमेरे इंटरनेटच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोग नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी नियंत्रण कक्ष, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आणि रायगड व मावळ निवडणूक नियंत्रण कक्षांशी जोडलेले राहतील.निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणाºया लिंकच्या माध्यमातून जनसामान्यही या वेळी या केंद्रांवरील कामकाज थेट पाहू शकणार आहेत. काही कारणास्तव इंटरनेट सेवा बंद पडली, तर मतदान केंद्रावरील कॅमेºयांचे रेकॉर्डिंग सुरूच राहील आणि त्यांनी केलेले रेकॉर्डिंग या सर्व ठिकाणी उपलब्ध करून देण्याचीदेखील व्यवस्था करण्यात आल्याचे रायगड बीएसएनएलचे अभियंता दीपक महाजन यांनी सांगितले.
मतदान केंद्रांवर आता जनसामान्यांचीही नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:05 AM