शाळांची संख्या घटली; मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:34 AM2020-11-26T00:34:18+5:302020-11-26T00:34:55+5:30
२६ शिक्षक, ७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह
रायगड : काेराेना कालावधीमध्ये शाळा सुरू केल्याने तिसऱ्या दिवशी शाळांची संख्या कमी झाली आहे, तर विद्यार्थ्यांची संख्या अल्प प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. सुरुवातीला महाड तालुक्यातील एकही शाळा सुरू झाली नव्हती. आता ताेच धडा उरण तालुक्यातील शाळांनी गिरवत दाेन दिवसांपासून सुरू केलेल्या शाळा बंद केल्या आहेत. २६ शिक्षक आणि सात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालकांच्या मनातील भीती वाढत आहे.
काेराेनाच्या महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑक्टाेबर महिन्यामध्ये काेराेनाचा आलेख उसळी घेत नसल्याने सरकारने मिशन बीगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात केली हाेती. त्यामध्ये पर्यटनस्थळे, वस्तुसंग्रहालये, गड-किल्ले, मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार अशा प्रार्थनास्थळांना परवानगी दिली हाेती. तसेच २३ नाेव्हेंबरपासून सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. पहिल्याच दिवशी ४६६ पैकी २२९ शाळा सुरू झाल्या हाेत्या. त्यामध्ये सुमारे सहा हजार ६६ विद्यार्थी उपस्थित हाेते. तर २४ तारखेला १९७ शाळा सुरू हाेत्या त्यामध्ये पाच हजार २७२ विद्यार्थी उपस्थित हाेते. २५ नाेव्हेंबर राेजी २०६ शाळा सुरू हाेत्या, तर सहा हजार ८४८ विद्यार्थी उपस्थित हाेते. पहिल्या दिवशीच्या तुलनेमध्ये तिसऱ्या दिवशी ७८२ अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. मात्र पहिल्या दिवशी २२९ शाळा सुरू हाेत्या तर तिसऱ्या दिवशी २३ शाळा बंद हाेत्या.
२५ नाेव्हेंबर राेजी
शाळांचा अहवाल
n नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा - ६४४
n नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी - १,४३,०७
n नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षक - ७,४१७
n नववी ते बारावीपर्यंतचे कर्मचारी - ३,७४३
n काेराेना चाचणी करण्यात आलेले शिक्षक - ३,६९२
n काेराेना चाचणीमध्ये पाॅझिटिव्ह रिपाेर्ट - २६
n काेराेना चाचणी करण्यात आलेले शिक्षकेतर कर्मचारी - १,५२८
n काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह रिपाेर्ट - ०७