पारंपरिक नारळ पाडेकऱ्यांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 12:31 AM2020-03-04T00:31:34+5:302020-03-04T00:31:45+5:30

वर्षभर चांगले उत्पन्न देणारे म्हणून नारळाच्या झाडाकडे पाहिले जाते. कोकणचा परिसर समृद्ध अशा नारळाच्या झाडांनी व्यापला आहे.

The number of traditional coconut crackers has decreased | पारंपरिक नारळ पाडेकऱ्यांची संख्या घटली

पारंपरिक नारळ पाडेकऱ्यांची संख्या घटली

googlenewsNext

आभय आपटे
रेवदंडा : वर्षभर चांगले उत्पन्न देणारे म्हणून नारळाच्या झाडाकडे पाहिले जाते. कोकणचा परिसर समृद्ध अशा नारळाच्या झाडांनी व्यापला आहे. प्रत्यक्षात मात्र नारळाला लागणारे उंदीर, किडीचा प्रादुर्भाव यासोबतच नारळ पाडेकऱ्यांची घटत चाललेली संख्या याचा परिणाम येथील बागायती उत्पन्नाला बसत आहे. अलिबाग तालुक्यातील चौल, आक्षी, नागाव व रेवदंडा या बागायती भागात नारळाच्या झाडावरून नारळ पाडण्यासाठी पाडेकरी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
कोकण म्हटले की, नारळ-सुपारीच्या बागा. केरळ राज्याप्रमाणे महत्त्वाचे नारळ उत्पादन देणारा कोकण प्रांत हा समृद्ध म्हणूनच गणला जायचा. या नारळाच्या झाडाच्या काथ्यापासून दोºया, करवंट्यापासून जळाऊ लाकूड, झाडांपासून शाकारणीसाठी लागणारे साहित्य बनविले जात असल्याने या वृक्षाला कल्पवृक्ष असेच मानले जायचे. सोबतच नारळ हे उत्पन्न देणारे फळ यामुळे सर्वाधिक लागवड या भागातच झाली. मात्र, उंचच उंच वाढणारे हे नारळाचे झाड सध्या साºयांच्याच समस्येचा विषय बनला आहे. कारण या झाडावर चढण्यासाठी पूर्वी सहजतेने मिळणारे पाडेकरी आता उपलब्ध होत नसल्याने झाडावरचे नारळ काढायचे तरी कसे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
सर्वसाधारपणे मागील दहा वर्षांचा विचार करता पाडेकरांचा जो समूह होता, त्यातील (अनेक सभासद) पाडेकरी हयात नाहीत. तर काहींना आता तब्येत साथ देत नसल्याने संख्या कमी झाली आहे. रेवस ते मुरुडपर्यंत अनेक नवीन बागायती तयार झाल्या आहेत. मात्र, पाडेकरी उपलब्ध होत नाहीत ही समस्या आहे. पाडेकºयांचे काम शिकवणाºया संस्था असल्या तरी प्रशिक्षण घेतल्यावर पाडेकरी तयार झालेले दिसत नाहीत.
>पाडेकरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत; पण उपलब्ध पाडेकºयांपैकी बहुतेक त्यांच्या मर्यादेमध्ये काम करत नाहीत. ३० दिवसांचे काम असेल तर तो पाडेकरी दहा दिवस भरतो.
- रूपेश बुरांड, बागायतदार
>सुमारे ४५ वर्षे नारळ पाडेकरी म्हणून काम करत असून, सर्वत्र शिक्षणाच्या झालेल्या सोयीमुळे या कामाकडे नवीन पिढी वळायला तयार नाही. काम मेहनतीचे असल्याने शासन दरबारी याची विम्याच्या संरक्षणसाठी दखल घेणे गरजेचे आहे. नारळ पाडल्यावर दोन माडांचे नारळ किंवा एका माडाप्रमाणे पैसे अशी मजुरी घेतली जाते.
- परशुराम नाईक, नारळ पाडेकरी, चौल-रामेश्वर
>आता ३० ते ४० पाडेकरी शिल्लक असून, मागील दहा वर्षांचा विचार करता ही संख्या चांगलीच घटत आहे. नारळ पाडताना अपघात झाल्यास शासकीय पातळीवर विम्याचे संरक्षण मिळाले तर नवीन पिढी या जोखमीच्या व्यवसायात वळतील.
- राजेश मुकादम, बागायतदार, रेवदंडा

Web Title: The number of traditional coconut crackers has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.