कोरोनाचा कहर; रायगड जिल्ह्यातील बाधितांनी ओलांडला १० हजारांचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:55 PM2020-07-20T23:55:20+5:302020-07-20T23:55:25+5:30

प्रशासन आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

The number of victims in Raigad district has crossed 10,000 | कोरोनाचा कहर; रायगड जिल्ह्यातील बाधितांनी ओलांडला १० हजारांचा आकडा

कोरोनाचा कहर; रायगड जिल्ह्यातील बाधितांनी ओलांडला १० हजारांचा आकडा

Next

- आविष्कार देसाई 

रायगड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. २४ तासांमध्ये किमान तीन मृतांची नोंद होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असताना, सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव तर नाही ना, असा संशय व्यक्त होत आहे. प्रशासन आणि सरकार जनतेच्या रक्षणासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,६७४ कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मनुष्यबळाअभावी आधीच कमकुवत स्थितीमध्ये आहे. जिल्हा कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल अशा नव्याने उपाययोजना करून, त्या ठिकाणी बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र, बेडची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्या कमी होणार नाही. यासाठी डोर टू डोर स्कॅनिक, कोम्बिंग आॅपरेशन, मास्कचा वापर करण्यावर भर देणे, सामाजिक अंतर राखण्याबाबत जागृती करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आॅक्सिजन बेडची संख्या वाढवणे, सरकारी रुग्णालयामध्ये पुरेशा सुविधा देतानाच मनुुष्यबळ पुरवणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे, अशा विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये खरच समन्वय आहे का? असा सवाल जिल्ह्यातील परिस्थितीवरून दिसत असल्याचे चित्र आहे. १६ ते २६ जुलै या कालावधीत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र, काही व्यापाऱ्यांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सकाळी ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत त्यामध्ये सवलत दिली. त्यामुळे आता बाजारांमध्ये कमालीची गर्दी होताना दिसत आहे. लॉकडाऊन हा कोरोनाला रोखण्यासाठी एकमेव पर्याय नक्कीच नाही. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे, असे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सामान्य माणसांना घरी बसायला सांगायचे आणि कोविडचा फैलाव करणाºया कंपन्यांना मोकाट सोडायचे, अशी दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असा काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांनी संताप व्यक्त करून सरकार आणि जिल्हा प्रशासनावर थेट हल्ला केला होता. अशा विविध कारणांनी कोविडचा प्रभाव रोखण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे. प्रशासनाने आणि सरकारने यामधून वेळीच धडा घेण्याची गरज आहे, अन्यथा कोरोना होण्याचे आणि कोरोनामुळे मरण्याचे हे सत्र असेच सुरू राहील.

जिल्ह्यात भयावह परिस्थिती

च्कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे आधी आजार असलेल्यांचाच मृत्यू होतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी नेहमीच सांगतात. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावते, त्यांचे दु:ख कोण जाणणार.
च्आमच्या घरातील व्यक्ती वयस्कर, आजारी असू दे, परंतु ती कोरोनामुळे आमच्यातून निघून जात आहे, याची जाणीव कोण ठेवणार, असाही प्रश्न मृतांच्या नातेवाइकांच्या मनात आहे. एकूणच जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे.

जिल्ह्यात भयावह परिस्थिती

च्कोरोनाला घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनामुळे आधी आजार असलेल्यांचाच मृत्यू होतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी नेहमीच सांगतात. मात्र, ज्यांच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावते, त्यांचे दु:ख कोण जाणणार.
च्आमच्या घरातील व्यक्ती वयस्कर, आजारी असू दे, परंतु ती कोरोनामुळे आमच्यातून निघून जात आहे, याची जाणीव कोण ठेवणार, असाही प्रश्न मृतांच्या नातेवाइकांच्या मनात आहे. एकूणच जिल्ह्यात भयावह परिस्थिती आहे.

आमच्यात समन्वय आहे. आम्ही चाचण्या, ट्रेसिंग उपचारावर भर देत आहोत. सुरुवातीला ४०० चाचण्या घेतल्या जात होत्या. आता ती संख्या १,२००च्या वर गेली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्यावर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. कोविड केअर सेंटरसाठी नवीन रुग्णालयांवर भर देत आहोत.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Web Title: The number of victims in Raigad district has crossed 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.