अंगणवाड्यांमध्ये बालके पोषण आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:48 AM2017-08-05T02:48:15+5:302017-08-05T02:48:15+5:30

येथे बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु त्या ठिकाणी येणाºया बालकांना पोषण आहार मात्र शासन देत नाही.

 Nutrition in the anganwadis is not without diet | अंगणवाड्यांमध्ये बालके पोषण आहाराविना

अंगणवाड्यांमध्ये बालके पोषण आहाराविना

Next

अजय कदम ।
माथेरान : येथे बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु त्या ठिकाणी येणाºया बालकांना पोषण आहार मात्र शासन देत नाही. अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली असून अंगणवाडीमध्ये येणा-या बालकांना पोषण आहार पोहचविण्याची जबाबदारी असलेला शहरी एकात्मिक बालविकास विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
२००९ मध्ये माथेरानमध्ये अंगणवाडी सुरू केली.शासनाच्या शहरी भागासाठी असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया तीन अंगणवाड्यांमध्ये माथेरानमधील ४५ बालके येत आहेत. त्यांना शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून पोषण आहार दिला जात होता. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या अंगणवाडी केंद्रावर बालकांना मागील जानेवारी महिन्यापासून पोषण आहार पुरविला जात नाही. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांची संख्या रोडावली आहे. माथेरानमध्ये वाल्मीकीनगर, मुस्लीम मोहल्ला आणि वन ट्री हिल या तीन नावाने अंगणवाडी केंद्रे चालविली जात आहेत. त्या प्रत्येक अंगणवाडी शाळेत साधारण १५-१८ बालके येत असून शून्य ते चार वयोगटातील बालकांची संख्या त्यात अधिक आहे. त्या सर्व बालकांवर लक्ष ठेवण्यासाठी २००९ पासून तीन सेविका आणि तीन मदतनीस यांची नियुक्ती केली होती, मात्र आज घडीला मदतनिसाचे एक पद रिक्त आहे.
अंगणवाडीमध्ये पोषण आहार मिळत नसल्याने बालकांना घरातून खाऊ घेऊन यावे लागते.त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाºया बालकांच्या संख्येत घट झाली आहे. शासन प्रत्येक बालकाला दरडोई ४ रु पये ९२ पैसे असे अनुदान बचत गटांना देते, त्या बदल्यात खाऊ शिजवून देण्याचे काम बचत गटांनी करावे अशी संकल्पना आहे. माथेरानमधील तिन्ही अंगणवाडी शाळेत येणाºया बालकांना जानेवारी २०१७ पासून पोषण आहार दिला जात नाही. त्याची माहिती घेतली असता बचत गटांना प्रत्येक बालकासाठी दिले जाणारे अनुदान हे बाजारभाव विचार करता न परवडणारे आहे. त्यात खिचडी शिजवून देण्यासाठी आणि अन्य खाऊ उकडून देण्यासाठी लागणारा गॅस यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात माथेरानसारख्या ठिकाणी आर्थिक गणिते जुळविताना अडचणी येते.

Web Title:  Nutrition in the anganwadis is not without diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.