माथेरानच्या चिमुकल्यांना पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:13 AM2017-08-12T06:13:32+5:302017-08-12T06:13:32+5:30
येथे चिमुकल्या बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु या ठिकाणी येणाºया बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जात नसे.
- अजय कदम
माथेरान : येथे चिमुकल्या बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु या ठिकाणी येणाºया बालकांना बचत गटामार्फत पोषण आहार दिला जात नसे. अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली होती. याबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये ४ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पोहचविण्याची जबाबदारी असलेले एकात्मिक बालविकास विभाग खडबडून जागा झाला आणि महिन्यापासून बंद असलेला पोषण आहार १० आॅगस्टपासून सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
२००९ मध्ये माथेरान येथे अंगणवाडी सुरू झाली. शासनाच्या शहरी भागासाठी असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून या अंगणवाड्या चालविण्यात येत असून येथे असणाºया तीन अंगणवाड्यांमध्ये ४५ बालके येत आहेत. त्यांना शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून पोषण आहार दिला जायचा.
शासनाच्या बदलत्या धोरणामुळे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या अंगणवाडी केंद्रावर बालकांना मागील जानेवारी महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा पोषण आहार पुरविला जात नव्हता. त्यामुळे अंगणवाडी शाळेत पोहचणाºया बालकांची संख्या रोडावली होती. अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. याची दखल घेत एकात्मिक बालविकास विभागाने माथेरानमधील ओम शांती बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार सुरु केल्याने येथे येणाºया चिमुकल्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
१ ते ७ आॅगस्टचा स्तनपान सप्ताह साजरा करण्यासाठी मी ५ आॅगस्टला माथेरानच्या अंगणवाड्यांना भेट दिली असता वर्तमानपत्रात आलेली बातमी वाचली आणि त्वरित याचा पाठपुरावा सुरू केला. बचत गटाला बालकाच्या प्रतिडोई ४ रु. ९२ पैसे दराने पोषण आहार दिला जायचा त्यामध्ये १ रु पयाची वाढ करून ५ रु . ९२ पैसे प्रति डोई दर दिल्यामुळे माथेरानमधील ओम शांती बचत गटाने पोषण आहार पुरविण्यास सुरु वात केली आहे.
- साधना पागी, पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास सेवा योजना, रत्नागिरी.
माथेरानमधील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार दिला जात नव्हता ही बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर याची शासनाने तत्काळ दखल घेऊन पोषण आहार सुरू केला आहे, त्यामुळे माथेरानमधील गरिबांची मुले कुपोषित राहणार नाहीत त्यामुळे शासनाचे आणि ‘लोकमत’चे आभार.
- कुलदीप जाधव, अध्यक्ष, क्षत्रिय मराठा समाज, माथेरान.