वेळास रस्त्यावर लावले धोक्याची सूचना देणारे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:37 PM2019-08-08T23:37:23+5:302019-08-08T23:37:32+5:30

श्रीवर्धन येथील बांधकाम विभागाला आली जाग : रस्ता खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

Occasional warning sign on the road | वेळास रस्त्यावर लावले धोक्याची सूचना देणारे फलक

वेळास रस्त्यावर लावले धोक्याची सूचना देणारे फलक

googlenewsNext

- गणेश प्रभाळे 

दिघी : आदगाव येथील समुद्रकिनाऱ्यालगत रस्ता खचला आहे. या मार्गावर चार मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता खचण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात होती. याबाबत आदगाव ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्ती व सूचना फलक लावण्याची मागणी होत असताना ‘लोकमत’ ने याकडे लक्ष देत ७ आॅगस्ट रोजी ‘सावधान... पुढे रस्ता खचतोय’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध के लीहोती. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन या मार्गावर धोकादायक सूचना फलक लावण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील वेळास- आदगाव मार्गावरील रस्ता खचत असल्याचे दिसत आहे. सध्या सततच्या पडणाºया पावसामुळे या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या रस्त्याला सूचना फलक नसल्याने दिवसा-रात्री प्रवास करतेवेळी वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत होते. काही दिवसांपासून सतत पडणाºया मुसळधार पावसाने व समुद्राच्या जोरदार क्षारयुक्त लाटांमुळे वेळास रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. सध्या जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्यालगत समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आहे. मात्र, तोही पूर्ण मोडकळीस आला आहे.

त्यामुळे वेळीच दुरुस्ती करावी व रस्त्यावर धोकादायक सूचना मिळाव्यात, नाही तर आदगावकडे जाणाºया मार्गावर रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. त्याच खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

येथे धोक्याची सूचना देणारा फलकही नसल्याने वाहनचालकांना अपघाताची शक्यता वर्तविली जात होती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरवाहनचालकांना सावध करण्यासाठी रस्त्याला धोकादायक फलक लावला आहे. वाहन चालकांना रात्रीच्या वेळी इशारा मिळावा अशी मागणी येथील नागरिक करत असताना वेळोवेळी रस्त्याबाबत समस्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करून अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करून रिफ्लेक्टर देखील लावण्यात आले आहे. वेळास - आदगाव रस्त्याला सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धोकादायक फलक लागल्याने वाहन चालकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Occasional warning sign on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.