शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिद्दीने के ली अपंगत्वावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:56 AM

साईनाथ पवार यांचा जन्म १९ सप्टेंबर १९८१मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या दुसºया वर्षी ताप येऊन पोलिओ ने दोन्ही पाय गेले.

अमूलकुमार जैन बोर्लीमांडला : साईनाथ पवार यांचा जन्म १९ सप्टेंबर १९८१मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या दुसºया वर्षी ताप येऊन पोलिओ ने दोन्ही पाय गेले. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड. यासाठी आईवडिलांनी मोलाची साथ दिली, अशा परिस्थितीतही स्वत: पायावर उभे राहायच्या या जिद्दीतून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण, घरापासून १० कि.मी. लांब अंतरावर असणाºया अलिबाग येथे छोटा भाऊ वैजनाथ व मित्र सूरज नाडकर, इरफान लोकरे यांच्या मदतीने पूर्ण केले. अथक परिश्रमाने रायगड जिल्हा परिषद येथे भरती प्रक्रि येत निवड होऊन सेवेत रु जू झाले.सा.प्र. विभाग, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभागात त्यांनी काम केले आणि आता ते समाज कल्याण विभागाच्या अपंग कल्याण कक्षात कार्यरत आहेत. स्वत: अपंग असल्याने आपल्याला मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. जिल्ह्यातील सर्व अपंगांना एकत्र करून प्रत्येकाला स्वावलंबी बनविण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. १९९५मध्ये दोन्ही पायांवर मुंबई येथे अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय हाजी अली येथे शस्त्रक्रिया केल्याने त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता आले. शस्त्रक्रि या करण्याआधी हातावर लहान मुलांसारखे रांगत होते. स्वत: ९० टक्के अपंगत्व असताना त्यावर मात करून जिद्दीने अपंगांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय अपंग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, पद, रायगड जिल्हा अपंग संघर्ष समितीचे अध्यक्ष पदभार ते उत्तमरीत्या पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०१६ला ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.