शासकीय कर्मचारी वसाहतींची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:59 AM2017-10-03T01:59:40+5:302017-10-03T01:59:45+5:30
महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत. याशिवाय भटके कुत्रे, वराहांचा वावरही वाढला आहे. तसेच सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
पनवेलमधील वाल्मीकीनगरच्या बाजूला शासकीय कर्मचारी वसाहत आहे. या ठिकाणी सात इमारतीत एकूण पन्नास सदनिका आहेत. सध्या चाळीस घरांत रहिवासी राहतात. उर्वरित दहा बंद अवस्थेत आहेत. येथे महसूल, पंचायत समिती, शिक्षकांबरोबर विविध विभागांत काम करणारे कर्मचारी राहतात. या इमारतींची अवस्था बिकट आहे. काही इमारतींना तडे गेले आहेत, प्लास्टरसुद्धा निघाले आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गळतीवर पर्याय म्हणून इमारतीवर पत्रा टाकला, परंतु ही उपाययोजना फक्त जुजबी होती. आजही भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्याशिवाय इमारतींच्या आवारात चार ते पाच फूट गवत वाढल्याने श्वापदांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन रहावे लागते.
साफसफाई होत नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून मलनि:सारण वाहिन्या
तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.