शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

खारकोपर -उरण रेल्वे मार्गाची अधिकाऱ्यांकडून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 8:29 PM

१२ जानेवारी रोजी प्रवासी वाहतूक सुरू करण्यावर अधिकाऱ्यांचे मौन.

मधुकर ठाकूर, उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खारकोपर पर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर शनिवारी (६) मुख्य रेल्वे ट्रॅक अभियंता अविनाश पांडे यांनी त्यांच्या पथकासह रेल्वे मार्गावरील ट्रॅकची पाहणी केली. या पाहणीवेळी आलेल्या रेल्वेला पाहायला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील खारकोपर पर्यंत प्रवासी वाहतूक पाच वर्षांपासून सुरू झाली आहे.दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण दरम्यानचा १८ किमी अंतरापर्यंतची प्रवासी वाहतूक केव्हा सुरू होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या अनेक सुरक्षा चाचण्या पार पडल्या आहेत.मात्र रेल्वे मार्गावरील अनेक तत्सम कामे अद्यापही पुर्णत्वास गेलेली नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्याने विलंबाने सुरू झालेले जासई-गव्हाण रेल्वे स्थानकाचे तर काम आजही अर्धवट अवस्थेत सुरू आहे.या मार्गावरील उर्वरित स्थानकांमधील कामेही थोड्याफार फरकाने सुरू आहेत.सुरक्षा चाचण्या करण्यासाठी अनेक वेळा रेल्वे उरण स्थानकापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळेया मार्गावरुन लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी अटकळ नागरिकांना बांधतात.मात्र त्यांच्या अनेक वेळा भ्रमनिरास झाला आहे.

शनिवारी (६) सकाळी १ वाजताच्या सुमारास मुख्य रेल्वे ट्रॅक अभियंता अविनाश पांडे हे त्यांच्या पथकासह रेल्वे मार्गावरील ट्रॅकची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते.यावेळी परख रेल्वे तपासणी वाहनही स्टेशनावर घुसले होते. कर्मचाऱ्यांचीही रेल्वे फलाट, भुयारी पादचारी मार्गातील साफसफाईच्या कामात गुंतले होते. यामुळे उरण स्टेशनात रेल्वे पाहण्यासाठी हौशी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.अटल सेतूचे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहेत.त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूकही सुरू करण्यात येणार आहे का याचीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. मात्र १२ जानेवारीला प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले.यामुळे रेल्वे सुरू होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड