आगरदांडा : मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांनासाठी सुरक्षेबाबत कोणतीही सुरक्षा सुविधा नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये रविवारी सकाळी प्रसिध्द होताच मुरूड समुद्रकिनारी बंदर निरीक्षक हितेद्र बारापत्रे, मुरूड जंजिरा नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे , नायब तहसीलदार रवींद्र सानप आदीसह अधिकाऱ्यांनी येथे येऊन सुरक्षाबाबत पाहणी करून चर्चा केली.शनिवारी पुणे येथील कसबा पेठ येथील सात जणांचा ग्रुप समुद मुरुड समुद्रकिनारी फिरावयास आला होता. सकाळी ११.३० च्या दरम्यात गणेश लक्ष्मण पवार (४०) व त्यांच्या मुलगा वेदान्त पवार (१५) हे दोघेही एका पॅराशूटवर स्वार होऊन आकाशात उडाले होते. पॅराशूट आकाशात उडताच अगदी काही मिनिटातच वर गेलेले पॅराशूटवरून दोघेही जमिनीवर जोरदार पडले त्यामधील वेदांन्त पवारचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गणेश पवार गंभीर झाले होते. ऐवढी मोठी घटना घडली तरी एक शासकीय अधिकारी घटनास्थळी हजर नव्हते. तसेच सुरक्षाबाबत कोणतीही सुसुविधा नसल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच अधिकाºयांची धावपळ उडाली. रविवारी सकाळी समुद्रकिनारी दाखल होत बंदर निरीक्षक हितेद्र बारापत्रे यांनी मोटारबाईक व घोडागाडी तसेच पाण्यात चालणाºया बोटिंगला सुरक्षाकारणावरून मनाई केली. नगरपरिषदचे मुख्याधिकारी दयानंद गोरे व नायब तहसीलदार दयानंद गोरे यांच्याशी सुरक्षाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चोत समुद्रकिनारी प्रवेश होतो त्या त्या ठिकाणी लोखंडी गेट लावण्याचे ठरविण्यात आले. जेणे करून चारचाकी गाडी समुद्रकिनारी येणार नाही. त्याकरिता बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे मुरूड जंजिरा नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.तसेच बेकायदेशीर धंदा समुद्रकिनारी करणाºयावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
अधिकाऱ्यांनी मुरुड समुद्रकिनारी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:21 AM