थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना 

By जमीर काझी | Published: October 24, 2022 04:05 PM2022-10-24T16:05:45+5:302022-10-24T16:07:16+5:30

थकीत वेतन व निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याच्या मागणी करणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धेला मारहाण करण्याची घटना नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली.

old woman who demanded unpaid wages was brutally beaten by the mayor and her husband in tala nagar panchayat | थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना 

थकीत वेतन मागणाऱ्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्यांच्या पतीकडून बेदम मारहाण; तळा नगरपंचायतीतील घटना 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

अलिबाग : थकीत वेतन व निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याच्या मागणी करणाऱ्या एका 65 वर्षाच्या वृद्धेला नगराध्यक्षा व त्याच्या पतीने शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण करण्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली. याबाबत तळा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर आणि त्यांचे पती चंद्रकांत भोरावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या मंगळवारी घडलेल्या घटनेबाबत ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांच्या पुढाकारामुळे  सोमवारी भोरावकर दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगल पारखे  (वय ६५ रा.सोनार आळी, ता. तळा) असे मारहाण झालेल्या वृध्देचे नाव आहे. त्या तळा ग्राम पंचायतीचया ग्रंथालयात नोकरीला होत्या मदतनीस म्हणून नोकरीला होत्या. त्या 2011 स* सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन-तीन सुमारे तीन वर्षाने ग्रामपंचायतचे रूपांतर त्याला नगरपाल झाले  आहे. थकित वेतन व वेतन निर्माण असे सुमारे दोन लाख रुपये कार्यालयाकडून येणे बाकी आहे ते मिळावे यासाठी त्या वारंवार तळा नगरपालिकेच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत होत्या मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता त्यामुळे त्या आपल्या मागणीबाबत नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर यांना १८ ऑक्टोबरला भेटण्यासाठी गेल्या होत्या. 

त्यावेळी त्या व पती चंद्रकांत भोरावकर यांनी  त्यांना शिवीगाळ केली. भोरावकर यांनी तू पुन्हा नगरपंचायत कार्यालयात आलीस तर तुला ठार मारू ,अशी धमकी देत हाताने व लाथेने  मारहाण केली. त्यांचा रूद्रावतर पाहून त्या घाबरून कार्यालयातून निघून गेल्या. तेथील कर्मचारी भांबावले होते. मात्र भीतीपोटी कोणी  वाचयता करण्याची हिंमत दाखवली नाही. गावात हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी सबंधित महिलेला धीर देत पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोमवारी तळा पोलीस ठण्यात भोरवकर दाम्पत्याविरुद्ध विनयभंग, मारहणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने परिसरात चर्चा सुरू असून मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी ,अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे

मारहाणीबद्दल नगराध्यक्ष यांचे पती  राजीव यांना संपर्क केला असता त्यांनी मी नंतर फोन करतो असे सांगत फोन कट करीत काही सांगण्यास नकार दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: old woman who demanded unpaid wages was brutally beaten by the mayor and her husband in tala nagar panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग