मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार तलावात बुडाली; जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 05:48 PM2022-07-10T17:48:58+5:302022-07-10T17:57:23+5:30
ग्रामस्थांनी तातडीने चालकाचे प्राण वाचवल्याने जीवितहानी टळली.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंबईगोवा महामार्गावर खरोशी फाटा जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तलावात कार बुडाल्याची घटना आज दिनांक १० जून रोजी घडली. ग्रामस्थांनी तातडीने चालकाचे प्राण वाचवल्याने जीवितहानी टळली.
सविस्तर वृत्त असे की, कल्याणवरुन पेणच्या दिशेने येत असलेली एम. एच. ०५- डी एस ५५०१ ही कार चालक भरधाव वेगाने चालवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदरची गाडी तलावात बुडाली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तात्काळ तलावात उडी मारून कार चालकाचे प्राण वाचविले. चालकाचे प्राण वाचविणार्या तरुणांचे ग्रामस्थ व प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मुंबईगोवा महामार्गावर खरोशी फाटा जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तलावात कार बुडाल्याची घटना आज दिनांक १० जून रोजी घडली. pic.twitter.com/r4Xk5Y181T
— Lokmat (@lokmat) July 10, 2022
घटनेची माहिती मिळताच दादर सगारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोविंदराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलाकर भऊड आदी पोलिसांनी घटनास्थळी त्वरित हजर राहून क्रेन टोचनच्या सहाय्याने तलावातुन काढण्यात आली.