अलिबाग - १ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचा ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला. सकाळी ८ वाजता अदिती तटकरे यांनी ध्वजरोहण केले. ध्वजरोहण कार्यक्रमनंतर पोलीस परेड झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधिकारी, नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. ध्वजरोहण कार्यक्रम नंतर अदिती तटकरे यांनी उपस्थितांना महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत भाषणातून संबोधित केले.
पोलीस विभागातर्फे यावेळी सुंदर असे संचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस विभागातील श्वान पथक, दंगल नियंत्रक पथक, मोटार बाईक पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, बँड पथक हे संचलनात सहभागी झाले होते.