मधुकर ठाकूर, उरण : कोरोना नव्हे तर इतर वेळीही जीव धोक्यात घालून नागरिकांची, जनतेची रांत्रदिवस सेवा करणारे स्वच्छता दूत,उनपच्या २५ सफाई कर्मचाऱ्यांचा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून उरण कॉंग्रेसने यथोचित सत्कार केला.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी (२) उरण शहर आणि तालुका कॉंग्रेसच्या वतीने उनपच्या सफाई कर्मचारी, स्वच्छता दूताच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.उरण तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विनोद म्हात्रे आणि उरण शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्त्री सफाई कामगारांना साडी-चोळी तर पुरुषांना शर्ट,पॅन्टपीस देऊन सत्कार करण्यात आला.अनेक ठिकाणी सफाई कर्मचा-यांचा योग्य तो मान सन्मान होत नाही असे खंत व्यक्त करत सफाई कर्मचा-यांना मानसन्मान देण्याच्या हेतूने व त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती प्रकाश पाटील यांनी दिली.जीवाची तमा न बाळगता जनतेची रात्रंदिवस सेवा करणारे सफाई कामगारच खरे स्वच्छता दूत आहेत. असशा भावना ही काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.तर असा मानसन्मान याआधी कधीच मिळाला नाही. या सत्कारामुळे आम्हाला काम करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले असल्याच्या भावना कामगारांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केल्या.
या आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर,उरण विधानसभा अध्यक्ष भालचंद्र घरत, महिला जिल्हा उपाध्यक्षा संध्या ठाकूर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, सेवादल रायगड जिल्हा सेक्रेटरी ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते अली मुकरी, सेवादल जिल्हाध्यक्ष कमलाकर घरत, महिला अध्यक्ष रेखा घरत, कळंबूसरे ग्रामपंचायतचे सरपंच सारिका पाटील, उरण शहर उपाध्यक्ष नदाफ अकबर, महिला शहर अध्यक्ष अफशा मुकरी, उरण शहर उपाध्यक्ष गुफरान तुंगेकर, भेंडखळचे उपसरपंच दिपक ठाकूर, सदानंद पाटील, अय्याज फकिह, सुनील काठे आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.