नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा

By निखिल म्हात्रे | Published: September 25, 2022 11:45 AM2022-09-25T11:45:15+5:302022-09-25T11:45:32+5:30

या देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे २.२९४ घटांची स्थापना करण्यात येणार आहे.

On the occasion of Navratri festival, 1,294 goddesses will be worshiped in Raigad district | नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा

नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा

Next

अलिबाग :  गौरी-गणपती सणानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे. नवरात्रौत्सव अगदी जवळ येऊन ठेपल्याने सर्वचजण देवीच्या आगमनाची वाट पहात असून, यावर्षी रायगड जिल्ह्यात सोमवारी २६ सप्टेंबर रोजी सार्वजनिकसह खासगी १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये १,१०९ सार्वजनिक, तर १८५ खासगी देवींचा समावेश आहे.

या देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे २.२९४ घटांची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये २०६ सार्वजनिक, तर २,०५८ खासगी घटांचा समावेश आहे. काही ठिकाणी सार्वजनिकसह खासगी १५९ देवींच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार असून, यामध्ये सार्वजनिक १५३, तर खासगी ६ देवींच्या फोटोंचा समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिकसह खासगी १,२९२ देवींच्या मिरवणुका निघणार असून, यामध्ये १,१०८ सार्वजनिक, तर १८४ खासगी मिरवणुकांचा समावेश आहे. याशिवाय घटांच्या सार्वजनिकसह खासगी २२७ मिरवणुका निघणार असून, त्यामध्ये २३ सार्वजनिक, तर २०४ खासगी घटांच्या मिरवणुकांचा समावेश आहे, तर अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलिस ठाणे हद्दीत देवींच्या फोटोंच्या दोन खासगी मिरवणुका निघणार असल्याचे जिल्हा पोलिसाकडून सांगण्यात आले.

नवरात्रौत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक अतिरिक्त पोलिस अधिक्षक, आठ उपविभागीय पोलिस अधिकारी, ९८ पोलिस सबइन्स्पेक्टर व सहायक पोलिस निरिक्षक, एसआरपीएफची एक तुकडी, आरसीपीची एक तुकडी, क्युआरटीची एक तुकडी, आठ स्ट्रायकिंग फोर्स, ४०० गृहरक्षक दलाचे स्वयंसेवकांसोबतच स्थानिक पोलिस स्टेशनचाही त्यांच्या हद्दीत कडक बंदोबस्त असेल.

Web Title: On the occasion of Navratri festival, 1,294 goddesses will be worshiped in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.