रायगडमध्ये दीड लाख मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:04 AM2021-01-14T00:04:12+5:302021-01-14T00:04:21+5:30

जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

One and a half lakh voters will exercise their right in Raigad | रायगडमध्ये दीड लाख मतदार बजावणार हक्क

रायगडमध्ये दीड लाख मतदार बजावणार हक्क

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
रायगड : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींसाठी २९९ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया १५ जानेवारीला पार पडणार आहे. एक लाख ७७ हजार ३८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या ८६ हजार ६३३ आणि पुरुष मतदारांची संख्या ९० हजार ७४८ आणि इतर दोन मतदारांचा समावेश आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवार, १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
मतदारांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे :- अलिबाग- ग्रामपंचायतींची संख्या-४, यामध्ये स्त्री मतदार चार हजार ४२, पुरुष मतदार चार हजार २४९, इतर ०, असे एकूण मतदार आठ हजार ७३१.

पेण - ग्रामपंचायतींची संख्या ७. यामध्ये स्त्री मतदार पाच हजार ९८५, पुरुष मतदार पाच हजार ८५३, इतर ०, असे एकूण मतदार ११ हजार ८३८.
पनवेल- ग्रामपंचायतींची संख्या-२२, यामध्ये स्त्री मतदार २६ हजार ९१, पुरुष मतदार २९ हजार २०५, इतर १, असे एकूण मतदार ५५ हजार २९७.
उरण- ग्रामपंचायतींची संख्या-६, यामध्ये स्त्री मतदार १५ हजार ६८८, पुरुष मतदार १५ हजार ६१५, इतर १, असे एकूण मतदार ३१ हजार ३०४.
कर्जत- ग्रामपंचायतींची संख्या-८, यामध्ये स्त्री मतदार १० हजार १७०, पुरुष मतदार १० हजार ४२४, इतर ०, असे एकूण मतदार २० हजार ५९४.
रोहा- ग्रामपंचायतींची संख्या-२१, यामध्ये स्त्री मतदार १५ हजार ९५९, पुरुष मतदार १६ हजार ८२२, इतर ०, असे एकूण मतदार ३२ हजार ७८१. माणगाव- ग्रामपंचायतींची संख्या-२, यामध्ये स्त्री मतदार चार हजार ७८४, पुरुष मतदार चार हजार ९४१, इतर ०, असे एकूण मतदार नऊ हजार ७२५. महाड- ग्रामपंचायतींची संख्या-३, यामध्ये स्त्री मतदार तीन हजार ४७४, पुरुष मतदार तीन हजार ६३९, इतर ०, असे एकूण मतदार सात हजार ११३.
श्रीवर्धन- ग्रामपंचायतींची संख्या-३ स्त्री मतदार दोन हजार ९५५, पुरुष मतदार दोन हजार ८०४, इतर ०, असे एकूण ५ हजार ७५९  मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

म्हसळ्यात २ ग्रामपंचायती
म्हसळा- ग्रामपंचायतींची संख्या-२, यामध्ये स्त्री मतदार एक हजार १९८, पुरुष मतदार एक हजार ११९, इतर ०, असे एकूण मतदार दोन हजार ३१७. अशा एकूण ७८ ग्रामपंचायतींमध्ये स्त्री मतदार ८६ हजार ६३३, पुरुष मतदार ९० हजार ७४८, इतर २, असे एकूण एक लाख ७७ हजार ३८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Web Title: One and a half lakh voters will exercise their right in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड