रोहा येथे ग्रामसेवकांचे एक दिवसीय धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:54 PM2019-08-09T22:54:32+5:302019-08-09T22:54:38+5:30
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन
धाटाव : राज्यातील २२ हजार ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनाला ९ आॅगस्ट क्रांतिदिनी सुरुवात झाली आहे. रोहा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाºयांनी पंचायत समिती कार्यालसमोर एकत्र येत धरणे आंदोलन केले. या वेळी रोहा गटविकास अधिकाºयांना आपल्या प्रलंबित मागण्या व असहकार आंदोलनाचे पुढील स्वरूप दर्शविणारे निवेदन दिले. ग्रामसेवक युनियनने पुकारलेल्या या असहकार आंदोलनाला पंचायत समिती कर्मचारी संघटनेनेही आपला पाठिंबा दर्शविला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकाºयांनी ९ आॅगस्टपासून आपल्या असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात रोहा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते. या वेळी गटविकास अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात आपल्या पुढील मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी. ग्रामसेवक संवर्गास शासन नियमाप्रमाणे प्रवासभत्ता मंजूर करावा. ग्रामसेवकाची शैक्षणिक अर्हता बदल करून पदवीधर उमेदवारांची निवड करावी. २०११ च्या लोकसंख्येनुसार राज्यभर ग्रामविकास अधिकारी सजे व पदे निर्माण करावीत. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात. २००५ नंतर सेवेत लागलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कर्त्यांना आगाऊ वेतनवाढ देत, ‘एक गाव एक ग्रामसेवक’ याची निर्मिती करावी. ग्रामसेवकांची अतिरिक्त कामे कमी करावीत या मागण्यांचे निवेदन दिले. यासोबतच ९ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट आंदोलनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा या निवेदनात दिली आहे. या दरम्यान फक्त जनतेची कामे करणार असे सांगत अन्य सर्व प्रशासकीय कामांवर बहिष्कार असणार, असे नमूद केले आहे. २२ आॅगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास त्यानंतर कामकाज बंद राहणार असा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे.