कोपरा उड्डाणपुलाखाली नेमलेल्या गार्डचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 03:59 PM2018-10-27T15:59:08+5:302018-10-27T16:04:39+5:30

सायन-पनवेल महामार्गावर कोपरा उड्डाणपुलाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. सुमारे दोन ते तीन महिने हे काम चालणार असून कोपरा उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग देखील याकरिता बंद करण्यात आले आहे.

one dead in accident on sion panvel expressway near kopara bridge | कोपरा उड्डाणपुलाखाली नेमलेल्या गार्डचा मृत्यू 

कोपरा उड्डाणपुलाखाली नेमलेल्या गार्डचा मृत्यू 

Next

पनवेल - सायन-पनवेल महामार्गावर कोपरा उड्डाणपुलाच्या कॉक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. सुमारे दोन ते तीन महिने हे काम चालणार असून कोपरा उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग देखील याकरिता बंद करण्यात आले आहे. कंत्राटदार कंपनीने याकरिता नेमलेल्या सुरक्षा रक्षकाचा शनिवारी पहाटे अपघातीमृत्यू  झाला आहे. 

उमेश यमुला (26) असे या मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर शनिवारी पहाटे 5.15 ते 5.30 दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या सुरक्षा  रक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

Web Title: one dead in accident on sion panvel expressway near kopara bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.