रोहा : कामावरून घरी परतणाºया सायकलस्वारास रोहाकडून कोलाडकडे जाणाºया अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे रोहा कोलाड रस्त्यावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होेती.रोहा कोलाडमार्ग दिवसेंदिवस डेंजर झोन ठरत आहे. वर्षभरात रस्त्यावर अनेक अपघात झाले. रहदारीच्या रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. अशोकनगर, उडदवणे वळणदार थांब्यावर गतिरोधक नाहीत. रस्त्याला साईडपट्टी नाही, याच रस्त्यावर पुन्हा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. उडदवणे येथील तुकाराम कोल्हटकर (५८), हे रात्री ८.३०च्या दरम्यान गावाकडे जात असताना त्यांना रोहाकडून कोलाडकडे जाणाºया अज्ञात वाहनाने ठोकर दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने उडदवणे यांसह संबंध तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्याने रोहा कोलाड रस्त्यावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होेती.रोहा-कोलाड मार्गावरून उडदवणे जाताना वळण घ्यावे लागते, ते वळण नेहमीच धोकादायक जाणवत आहे, त्या ठिकाणच्या वळणदार मार्गावर गतिरोधक असता तर अपघात झाला नसता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. उडदवणे थांब्यावर बांधकाम विभागाने तातडीने गतिरोधक बसवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
रोह्यातील अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 3:57 AM