कामोठ्याच्या MGM हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा एक तास संप; रुग्ण, नातेवाईक संभ्रमात
By वैभव गायकर | Published: April 22, 2024 05:05 PM2024-04-22T17:05:24+5:302024-04-22T17:06:26+5:30
११च्या सुमारास पुकारला होता संप, १२.३०च्या सुमारास परिस्थिती सुरळीत झाली.
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: कामोठे मधील एमजीएम मधील डॉक्टरांनी 22 रोजी सकाळी 11 च्या सुमारास संप पुकारला होता. नर्सिंग स्टाफ मधील कर्मचाऱ्यांने एका डॉक्टरसोबत गैरवर्तणूक केल्याने या डॉक्टरांनी संप पुकारत काम बंद केले. एमजीएम प्रशासनाने संबंधित गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केल्याने डॉक्टरांनी संप मागे घेतला. तासभर डॉक्टरांचे नाराजीनाट्य चालले. विशेष म्हणजे प्रचंड उकाड्यात सर्व सामान्य गरीब रुग्णांना एमजीएम रुग्णालयाचा मोठा आधार आहे. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात या ठिकाणी उपचार घरणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक संभ्रमात आले होते. अखेर संप मागे घेतल्याने एमजीएम मधील परिस्थिती 12.30 च्या सुमारास सुरळीत झाली.