खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या दोन भीषण अपघातांत एक जण ठार तर ३७ जण जखमी झाले.मुंबई-पुणे महामार्गावर शेडवली फाटा येथे पहाटे ४ वाजता पहिला अपघात घडला. आयशर गाडी, पिकअप आणि टेम्पो यामध्ये जोरदार टक्कर होऊन त्यात एक जण ठार तर एक जण जखमी झाला, तर ठाकूरवाडीजवळील उतारावर गुजरात राज्याची खासगी प्रवासी बस व ट्रकमधील भीषण अपघातात तब्बल ३७ प्रवासी जखमी झाले. बसमधील सर्व जण दिवाळी सुटीनिमित्त महाराष्ट्रात पर्यटनासाठी आलेहोते. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्व जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आलेत. यादरम्यान खोपोली पोलीस, नगरपालिका रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर व खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाºया सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी महत्त्वाची मदत केली.मुंबई-पुणे महामार्गावरून पुणे बाजूकडून ट्रकचालक कशाप्पा करबसपा बिरादार (५0, रा. नेहरूगंज, ता. बिदर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हा अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन मुंबईकडे निघाला होता. सकाळी ६.२0 वाजण्याच्या दरम्यान मिळ ठाकूरवाडी येथे आला असता, त्याच्या पाठीमागून मोमाई कृपा ट्रॅव्हलची बस (राजकोट गुजरात येथील) ६0 प्रवासी शिर्डी, शनीशिंगणापूर असे देवदर्शन करून मुंबई दर्शनसाठी पुणे बाजूकडून जुन्या महामार्गावरून येत असताना बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात येणारी बस पुढे असणाºया ट्रकवर आदळल्याने जोरदार अपघात घडला.अपघातात ट्रक रस्त्याखाली उतरून पलटी झाला तर प्रवासी असलेली खासगी बस रस्त्यावर पलटी झाल्याने बसमधील कांचनबेन जयेश राठोड (४२), राजूबेन अर्जुन झरीया (६0), गीता चंदू मकवाना (५0), अबेर राजेश शिआर (दीड वर्ष), भावना उमेश जाखटीया (३५), पूजा राजेश शिआर (२४), गीताबेन प्रवीण झरीया (४0), शारदाबेन लालसिंग कारेलिया (६५), चंदनबेन मनसुखभाई पटेल (३६), जयश्री शिवलाल झरीया (४४), काळूभाई देवदूतभाई करपोडा (५0), मनोज रामसिंग झरीया (३३), नेहा चंदूभाई झरीया (१७), दिनेश श्याम गिरी (४८), योगेश प्रवीणभाई झरीया (२१), विपुल मनाजीभाई वायकोटी (४0), प्रथम मनोज झरीया (१0), रंजन मैसीभाय राठोड (६0), दमयंत काजीलाल गोयल (५0), ताराबाई मगनलाल सोलंकी (५0), भूपेंद्र प्रसाद प्रभाकर (१८), विवेक काशिनाथ संतोषकर (२१), धर्र्मेंद्र रामप्रकाश वर्मा (२४), गुणवंती चंदू मकवाना (३४) , आशीवीन मनोजभाई जरिया (३0), काळूबाई देवयत परबडा (५५) यांच्यासह एकूण ३६ जण जखमी झाले.यातील सात जणांना जबर मार असल्याने खोपोली रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन त्यांना तत्काळ कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत १ ठार तर ३७ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:54 AM