खालापूरमध्ये दोन अपघातांत एक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:14 AM2019-04-08T00:14:56+5:302019-04-08T00:15:38+5:30

पहिला अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालापूर हद्दीत मौजे कलोते गावापुढे अज्ञात वाहन चालकाने कंटेनर क्र मांक एमएच ४६- एच ५७२५ हा पनवेलहून खोपोलीच्या दिशेने निघाला होता.

One killed in two accidents in Khalapur | खालापूरमध्ये दोन अपघातांत एक ठार

खालापूरमध्ये दोन अपघातांत एक ठार

googlenewsNext

मोहोपाडा : खालापूर हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या घटनेत कोणी जखमी नसले तरी कारचे नुकसान झाले आहे.


पहिला अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालापूर हद्दीत मौजे कलोते गावापुढे अज्ञात वाहन चालकाने कंटेनर क्र मांक एमएच ४६- एच ५७२५ हा पनवेलहून खोपोलीच्या दिशेने निघाला होता. वृषभ हॉटेलसमोर आला असताना अचानक समोर आलेल्या पादचाऱ्याला कंटेनरची जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या पादचारी प्रदीप कोट्टीयन यांना तातडीने खोपोली येथे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु डोक्याला आणि कमरेला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस शोध घेत आहेत.


दुसरा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडला असून शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हर्ष परेश चोखावाला (२९, रा. ताडदेव मुंबई) हा कार क्र मांक एमएच-०४-बी.एन-७८३७ ही मुंबई-पुणे मार्गाने पुणे बाजूकडे चालवित घेऊन जात असताना मौजे कुंभिवली गावच्या हद्दीत आल्यावर कार क्र मांक एमएच-१२-पीएस-११०९ वरील चालकाने अतिवेगाने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हर्षच्या कारला ओव्हरटेक केले. पुढे जाणाºया कारला मागील बाजूस ठोकर मारली. त्यामुळे कार हर्षच्या अचानक समोर आल्याने त्याने कारला नियंत्रित करण्यासाठी ब्रेक दाबला असता कार रस्त्यालगतच्या पत्र्याच्या दुभाजकावर आदळून अपघात झाला. अपघातास कारणीभूत कार क्रमांक एमएच-१२-पीएस-११०९ वरील चालकाविरुद्ध हर्ष चोखावाला यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस नाईक अमित सावंत हे करीत आहेत.


डम्परची एसटीला धडक
नागोठणे : वेगात उलट दिशेला येऊन डम्परने समोरून येणाºया एसटीला जोरदार धडक दिल्याने सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला.


श्रीवर्धन आगाराची एम एच २० बीएल २९१४ क्रमांकाची बस कोलमांडल्याहून मुंबईकडे, तर एम एच ०४ जी एफ २४१ क्रमांकाचा डम्पर मुंबई बाजूकडून नागोठणेकडे येत होता. अपघातात रमेश रटाटे, रमिला रटाटे, मंगला जाधव, रणजित करंजकर, नारायण पाटील, शशिकांत पाटील आणि अर्चना करंजकर हे श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. डम्परचालक राम आसरे वर्मा (रा. शिवडी, मुंबई) याच्याविरोधात नागोठणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in two accidents in Khalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.