अपघातात एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:44 AM2019-05-30T05:44:07+5:302019-05-30T05:44:09+5:30

माणगाव : माणगाव परिसरात धरणाचीवाडी येथे बुधवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. येथून बुधवारी सकाळी कार मुंबईकडे जात होती. ...

One killed, two serious in the accident | अपघातात एक ठार, दोन गंभीर

अपघातात एक ठार, दोन गंभीर

Next

माणगाव : माणगाव परिसरात धरणाचीवाडी येथे बुधवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. येथून बुधवारी सकाळी कार मुंबईकडे जात होती. या वेळी माणगावकडे जाणाऱ्या ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक सतीश वाघमारे (३०, रा. वासुंडे, ता. सुधागड) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या समवेत कारमध्ये असलेले प्रवासी मिलिंद सांळुखे, मंगेश साळुंखे (दोन्ही रा. वासुंडे) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: One killed, two serious in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.