लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: मुंबई गोवा महामार्गावरील एक लेन गणेशोत्सवापुर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते.मात्र पळस्पे फाट्यापासुन पुढे पेण पर्यंत ठिकठिकाणी अर्धवट कामांचा फटका कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला असुन मनसेचे पनवेल महानगरपालिका अध्यक्ष योगेश चिले यांनी चव्हाणांवर टीका केली आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडले आहेत.मात्र खराब रस्त्यामुळे या चाकरमान्यांना आपल्या निश्चितस्थळी पोहचण्यास अडथळा निर्माण होत आहे.मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे या चाकरमान्यांची डोकेदुखी ठरली आहे.दरम्यान जुन्या मुंबई पुणे महामार्गावर देखील वाहनांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोंडी पाहता अनेकांनी जुन्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला मात्र पळस्पे फाटा येथील वाहतुक कोंडी पुढे भिंगार गावापर्यंत आल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा याठिकाणी पहावयास मिळाल्या.बंदी असताना अधून मधून या मार्गावर अवजड वाहने देखील रस्त्यावर धावताना दिसल्याने या अवजड वाहनांमुळे देखील वाहतुकीस अडथळा निर्माण होताना दिसले.
फोटो समाजमाध्यमांवर फोटो
सरकार तर्फे मुबंई गोवा महामार्गाची एक लेन पुर्ण करण्याचा कितीही दावा केला तरी या मार्गाच्या दुरावास्थेबाबतचे फोटो प्रवासा दरम्यान चाकरमान्यांनी सोशल मीडियावर शेअर करून शासनाचा दावा फोल ठरवला.